सोलापूर : जिल्हा परिषदेमधील 11 कंत्राटी सुरक्षा रक्षक,स्वच्छता कर्मचाऱ्यांना सालाबादप्रमाणे रमजान ईद निमित्त जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने वस्त्र, ड्रायफूट व सणासाठी आवश्यक मिष्टान, सर्व पदार्थ,सुगंधी अत्तर, सुरमा समाविष्ट असलेले किटचे वाटप जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्याहस्ते करण्यात आले.
दक्षिण सोसोलापूर पंचायत समितीमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दक्षिणचे तहसीलदार किरण जमदाडे यांच्याहस्ते देण्यात आले. दोन्ही मान्यवरांनी सर्वांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.सामाजिक जाणिवेतून दिलेले सहकार्य हे राष्ट्रीय एकात्मता प्रगल्भ होण्यासाठी कारणीभूत ठरतात. त्यामुळे अशा उपक्रमाची गरज असल्याचे मत उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, नायब तहसीलदार विठ्ठल जाधव,जिल्हाध्यक्ष तजमुल मुतवली,विभागीय संघटक डॉ. एस. पी .माने, लिपिकवर्गीय संघटनेचे सरचिटणीस नागेश पाटील,सचिन सोनकांबळे, कार्याध्यक्ष बसवराज दिंडोरे, रणजीत घोडके,उपाध्यक्ष विशाल घोगरे,सचिव विलास मसलकर,कोषाध्यक्ष रोहित घुले, गणेश साळुंखे, विशाल उंबरे,जहुर शेख, श्रीशैल देशमुख,चेतन वाघमारे, शिवानंद म्हमाने, रफीक मुल्ला,हरून नदाफ,शहानवाज शेख ,रफीक शेख ,उस्मान शेख,इरफान कारंजे, बशीर शेख,इस्माईल सय्यद, सिंकदर शेख,सादिक शेख, जमीर शेख,राजीव गाडेकर,राकेश सोडे, रहीम मुल्ला, प्रभाकर डोईजोडे,प्रमोद मोरे, ओमप्रकाश कोकणे,मिथुन भिसे, मल्लिकार्जुन स्वामी उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक विवेक लिंगराज यांनी केले तर सूत्रसंचालन विशाल घोगरे यांनी केले आणि आभारप्रदर्शन रोहित घुले यांनी केले. या बांधवांनी सर्वांना ईद निमित्त शिरखुर्माचे स्वाद घेण्यासाठी यावे, असे आग्रहाने निमंत्रित केले.