सोलापूर :सोलापूर उपप्रादेशिक परिवहन कार्यालयास सन 2023-24 या आर्थिक वर्षात 202.95 कोटी रुपयांचा महसुल मिळाला आहे. आर्थिक वर्षात दिलेल्या उद्दीष्ठापैकी 87.93 टक्के इतक्या महसूलाची वसूली करण्यात आलेली असल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.
सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयातील वायुवेग पथकाने 706.16 लक्ष इतके तडजोड शुल्क वसूल केले असून एकूण उदिष्टांच्या 100.88 टक्के इतके तडजोड शुल्काची वसुली करण्यात आलेली आहे. कर वसूली (चालू कर व थकित कर) 329.19 इतकी केलेली आहे. वायुवेग पथकामार्फत हेल्मेट न वापरणाऱ्या 6,894 दोषी व्यक्तींवर, वाहन चालवताना मोबाईलचा वापर करणारे 470 जणांवर, सीटबेल्ट प्रकरणी 1,279 जणांवर कारवाई करण्यात आलेली असून विमा नसलेली 6,826 वाहने, पीयूसी नसलेली 3,926 वाहने, योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण नसलेली 6,091, रिफलेक्टर/टेल लॅप नसलेली 3,027 व क्षमत्ोपेक्षा जास्त माल वाहत्ूाक करणाऱ्या 934 वाहनांवर दंडात्मक स्वरुपाची कारवाई करण्यात आलेली आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये 62,763 इतक्या नवीन वाहनांची नोंद सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे झालेली असून त््याामध्ये मोटार सायकल वाहन संख्या 48,135, मोटार कार संख्या 5,934, मोटार कँब संवर्ग वाहन संख्या 209, ॲटोरीक्षा वाहन संख्या 1,128, सर्व प्रवासी वाहन संख्या 141, सर्व मालवाहू संवर्गातील वाहन संख्या 2,876 व इतर संवर्गातील वाहन संख्या 4,340 अशी आहे. तसेच सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये एकूण 28,936 अर्जदारांना लायसन्स (अनुज्ञप्ती) देण्यात आलेली आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये नांदणी येथील सीमा तपासणी नाका येथे 11 कोटी 15 लाख 78 हजार 320 रुपये इतके तडजोड शुल्क़ व 5 कोटी 42 लाख 9 हजार 715 रुपये इतकी कर स्वरूपातील महसूलाची प्रत््याक्ष वसुली केलेली असून एकूण उदिष्टांच्या 97.50 टक्के इतक्या महसूलाची वसूली करण्यात आलेली आहे. कात्राळ सीमा तपासणी नाका येथे 29 लाख 59 हजार रुपये इतके तडजोड शुल्क व 51 लाख 79 हजार 415 रुपये इतके कर महसूलाची प्रत््याक्षात वसुली केलेली असून एकूण उदिष्टांच्या 162.76 टक्के इतक्या महसूलाची वसूली करण्यात आलेली आहे.
सन 2023-24 या आर्थिक वर्षामध्ये अटकावून ठेवलेल्या वाहनांचा ई-लिलाव करण्यात आला असून या ई-लिलावामधून 16 लाख 80 हजार 400 रुपये इतका महसूल मिळालेला आहे. कालबाहय झालेल्या अभिलेखाचे निर्लेखन करण्यात आले असून त््याामधून 3 लाख 6 हजार 16 रुपये इतका महसूल प्राप्त झालेला असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.
सोलापूर कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नात्ूान शासनाने दिलेल्या उद्दिष्ठांपर्यत पोहोचण्याचा प्रयत्न केला असल्याचेही गायकवाड यांनी सांगितले.