➡ घटक :- सोलापूर
➡ तक्रारदार :- महिला, वय 30 वर्ष
➡ आरोपी लोकसेवक –
1) श्री. अविनाश देसाई अंकूश, वय – 50 वर्षे, पद- कनिष्ठ लिपीक नेम- प्राथमिक आरोग्य केंद्र, वैराग ता. बार्शी जि. सोलापूर वर्ग-3 रा. स्वरुपानंद नगर, वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर 2) श्री. बाबासाहेब सुभाष माने, वय – 40 वर्षे, पद- सहायक लेखाधिकारी नेम- पंचायत समिती बार्शी, जि. सोलापूर वर्ग -3 रा. शिवाजी नगर, वैराग, ता. बार्शी जि. सोलापूर 3) इलोसे श्री. निखिल दत्तात्रय मांजरे, वय – 32, पद- डाटा एंट्री ऑपरेटर(कंत्राटी) पंचायत समिती बार्शी, जि. सोलापूर रा. मु.पो. देवगांव ता. बार्शी जि. सोलापूर
➡ लाच मागणी :- 3000/- रुपये
➡ लाच स्विकारली :- 2000/-
➡ पडताळणी दिनांक :- दि. 08/04/2024
➡ सापळा दिनांक व ठिकाण :- दिनांक 08/04/2024 रोजी
पंचायत समिती कार्यालय बार्शी, जि. सोलापूर
➡ हकीकत :- यातील तक्रारदार यांना व त्यांचे पतीस 2021 मध्ये कोविड आजाराचा संसर्ग झाला होता. तसेच तक्रारदार यांची आई पाय घसरून पडून डोक्यास मार लागला होता. त्याबाबत सदर उपचाराचा खर्च तक्रारदार यांनी केला होता. उपचाराकरीता झालेल्या खर्चाचे बिल मिळणेकरीता सन 2021 मध्ये तक्रारदार यांनी जिल्हा परिषद सोलापूर यांचेकडे अर्ज केला होता. सदरचे तिन्ही बिल मंजूर होऊन पंचायत समिती बार्शी येथील अर्थ विभागाकडे बिल अदा करण्यासासाठी निधी प्राप्त झाला होता.
यातील लोकसेवक अविनाश अंकुश यांनी तक्रारदार यांचेकडे बिल अदा करणेसाठी बाबासाहेब माने यांचे नावे 2000/- रुपये लाचेची मागणी केली, त्यानंतर बाबासाहेब माने यांची पडताळणी केली असता त्यांनीही बिल अदा करणेसाठी 2000/- रुपये लाचेची मागणी केली. व प्रत्यक्ष सापळा कारवाई दरम्यान बाबासाहेब माने यांचे सांगणेवरून कंत्राटी कर्मचारी निखील मांजरे यांचेमार्फत लाच रक्कम स्विकारली आहे. यावरुन वर नमुद आरोपी क्र. 2 व 3 यांना ताब्यात घेवुन गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया बार्शी शहर पोलीस ठाणे सोलापूर ग्रामीण येथे सुरु आहे.
➡ सापळा पथक :- श्री. चंद्रकांत कोळी, पोलीस निरीक्षक, लाप्रवि, सोलापूर.
पोलीस अंमलदार- पोना/संतोष नरोटे, पोशि/ गजानन किणगी,
चालक पोह/ राहुल गायकवाड
सर्व नेमणुक – अॅन्टी करप्शन ब्युरो सोलापूर
➡ मार्गदर्शन अधिकारी :-
श्री. अमोल तांबे, पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र. (मोबाईल क्रमांक 9922100712)
डॉ. शीतल जानवे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे. (मोबाईल क्रमांक 9921810357)

सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की आपणास कोणी शासकीय अधिकारी / कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ आमच्याशी संपर्क साधावा.
गणेश कुंभार
पोलीस उप अधीक्षक
लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर.
मोबाईल क्र. 9764153999
कार्यालय क्र. 0217-2312668
ईमेल dyspacbsolapur@gmail.com

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *