March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

मोदी यांनी दिले एससी, एसटीच्या लोकांना विनाजामीन, विनातारण कर्ज

सोलापूर :  2014 पासून भाजप सरकार या देशांमध्ये आल्यानंतर अनुसूचित जाती व जमातीसाठी वेगळी योजना राबविण्यात आली. पूर्वी मागासवर्गीयांना कुठल्याही बँकेत गेल्यानंतर एक लाख रुपये लोन घेण्यासाठीसुद्धा त्यांना घर तारण आहे का? जागा तारण आहे का? अशा गोष्टींची विचारणा बँकांकडून करण्यात येत होती. त्याच्यानंतर जेव्हा डिक्कीची स्थापना झाली त्यानंतर मागासवर्गीयांसाठी उद्योजक घडविण्याचे काम सुरु झाले. ह्या देशामध्ये मागासवर्गीयांसाठी उद्योग करायचा असेल तर पैशाची गरज असताना कुठल्या बँकांची सेक्युरिटी नसताना बँका लोन देत नव्हत्या म्हणून स्टैंड अप इंडिया योजना ही 2017 सन अंमलात आणण्यात आली. हे फक्त आणि एस्सी-एसटी ह्या उद्योगांसाठीच असून मागासवर्गीय हे नोकरी मागणारे नसून नोकरी देणार आहेत हा उद्देश आहे. म्हणून त्या स्टैंडर्ड अंतर्गत एस्सी-एसटी साठी एक कोटी रुपयांची व्यवसायासाठी एक कोटी रुपयांची कोणतेही तारण व जमीनदार न घेता या योजनेची बँकांमध्ये अंमलबजावणी करण्यात अली. त्यामुळे डिक्कीने भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांना पाठिंबा देण्याचे ठरविले असल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

2020 मध्ये डिक्कीने मोदी सरकारला विनंती केल्यावर देशभरामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 125 व्या जयंतीनिमित्त देशभरामध्ये एक लाख 25 हजार राष्ट्रीयकृत बँकाना एका वर्षामध्ये फक्त एकाला एक कोटी फायनान्स करून त्याला उद्योजक बनवायचा टार्गेट देण्यात आले. मोदी सरकारने सर्व बँकांना रिझर्व बँकेकडून ही नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले. तेव्हापासून सर्व राष्ट्रीयकृत बँकांकडून अनुसूचित जाती जमातीसाठी एक एक उद्योजक व्यापार करण्यासाठी एक कोटीचा फायनान्स करण्यात आला. असे देशभरामध्ये सध्याचे स्थितीमध्ये स्टैंड अप इंडिया या योजनेअंतर्गत अडीच लाख मागासवर्गीय अनुसूचित जाती जमातिचे उद्योजक तयार झाले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रोत्साहन योजनाअंतर्गत 15% सबसिडी देण्यात आली. त्याचबरोबर केंद्र सरकारकडून या योजने अंतर्गत लोन अमाऊंटच्या 25% सबसिडी देण्यात आली. असे  आतापर्यंत कोणत्याही सरकारने केले नव्हते. फक्त आणि फक्त मोदी सरकारने ही योजना यशस्वी करून दखवली. यासाठी म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) चे पदाधिकारी व सोलापूर जिल्ह्यातील सदस्यांच्यावतीने सोलापूर लोकसभेचे उमेदवार रामभाऊ सातपुते यांना जाहीर पाठिंबा जाहीर  केला आहे.

ही योजना आणण्यासाठी डीक्कीचे  संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. मिलिंद कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही योजना राबवत आहेत.म्हणून दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (डिक्की) सोलापूर शहर व जिल्हा यांच्यावतीने लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत राम सातपुते यांना जाहीर पाठिंबा देत आहोत असे  डीक्कीचे जिल्हा समन्वयक सिद्धाराम चाबुकस्वार, विजय माने, दत्तात्रेय वाघमारे, आशीष धोलराव, डोंगरेश चाबुकस्वार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.