सोलापूर : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील ‘त्या” लज्जास्पद प्रकरणानंतर आता कर्मचाऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचा संघटनेने आरोप केल्यामुळे प्रकरण गंभीर बनले आहे.
जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष समीर शेख यांनी याबाबत 19 एप्रिल रोजी जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयास पत्र दिले आहे. या पत्रात त्यांनी करमाळा तालुक्यातील जेऊर आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांच्या सामूहिक तक्रारीचे उदाहरण दिले आहे. संबंधित डॉक्टर कर्मचाऱ्यांना दमदाटी करून आर्थिक नुकसानीची धमकी देतात असे या पत्रात नमूद केले आहे. आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेची तक्रार गंभीर आहे.
संघटनेच्या या तक्रारीवरून आरोग्य भागात चाललेल्या कारभाराचा शोध घेतला असता अनेक गंभीर बाबी पुढे आल्या आहेत. कर्मचाऱ्यांबरोबर डॉक्टरांचेही पगार अडवले जातात अशी तक्रार करण्यात आली आहे. पगाराच्या टेबलाला बसलेला कर्मचारी फायलीला ‘आडा” कुल करतो, असे सांगण्यात आले. लक्ष्मी दर्शनानंतरच संबंधित कर्मचारी वरिष्ठांपुढे पगारीची फाईल ठेवतो. गेल्या दहा वर्षापासून त्याचा हा उद्योग सुरू असल्याचे सांगण्यात आले. संघटनेची तक्रार आल्यानंतरही आरोग्य अधिकाऱ्यांनी याकडे का दुर्लक्ष का केले? असा आता सवाल उपस्थित केला जात आहे.
जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटनेने दिलेले निवेदन व्हाट्सअपवरून मला मिळाले आहे. या तक्रारीची चौकशी करण्यास प्रशासन विभागाला सांगितले आहे.
मनीषा आव्हाळे,
मुख्य कार्यकारी अधिकारी,
जिल्हा परिषद सोलापूर.