गोदुताई घरकुल योजनेला जलजीवन मिशनमधून मिळाले पाणी
झेडपीच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांनी केली पाहणी

सोलापूर : जलजीवन मिशनची योजना कार्यान्वित झालेमुळे विडीघरकुलसह कुंभारीची पाणी टंचाई कमी होण्यास मदत झाली आहे. दरम्यान शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी कुंभारीअंतर्गत गोदुताई परूळेकर विडी घरकुल वसाहतीमधील जलजीवन मिशनच्या कामांची पाहणी केली.
याप्रसंगी पाणी व स्वच्छतेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, कार्यकारी अभियंता सुनील कटकधोंड, महाराष्ट्र जिवन प्राधिकरण चे कार्यकारी अभियंता प्रविण पाटील, उप अभियंता संजय धनशेट्टी, ग्राम विकास अधिकारी सहदेव ढेपे उपस्थित होते. सीईओ मनिषा आव्हाळे यांनी धाडसी निर्णय घेत जलजीवन मिशनचे कामांचा सपाटा लावला आहे. एक एक योजना कार्यान्वित होत असून जलजीवनच्या कामांना गती मिळत आहे. शुक्रवारी कुंभारी येथील गोदुताई परूळेकर विडी घरकुल वसाहतीमधील 8.50 दशलक्ष जल शुध्दीकरण केंद्राची पाहणी केली. जलशु्ध्दीकरण केंद्र तसेच टॅंकर फिडींग केंद्रास भेट देऊन पाहणी करताना सीईओ मनिषा आव्हाळे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.यामधील पाणी कुंभारीच्या जलसाठवण ८ दशलक्ष लिटर क्षमतेच्या टाकीची पाईपलाईन जोडून टाकण्यात आली आहे. त्यामुळे कुंभारी येथे महिन्यातून १५ दिवसाला मिळणारे पाणी आता सात दिवसावर आले आहे. सध्या कुंभारी येथे दोन टॅंकर सुरू आहे. टॅंकर ची क्षमता कमी होणार आहे. पूर्ण क्षमतेने जलजीवन मिशन ची योजनेतील पाणी सुरू झाली आहे.
जलजीवन मिशन अंतर्गत कुंभारी येथील जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पुर्ण क्षमतेने सुरू झाल्याचा आनंद आहे. सध्या टॅंकरने पाणी पुरवठा सुरू असला तरी या टॅंकरची संख्या कमी होऊन सर्व भागात पाणी पूर्ण क्षमतेने देण्याच नियोजन आहे. पाण्याचा वापर ग्रामस्थांनी जपून करावा. पाणी शिळे होत नाही. नवीन पाणी आले कि शिळे झाले म्हणून पाणी टाकून देऊ नका. असे कळकळीचे आवाहन सीईओ मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.