सोलापूर : जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे माजी अध्यक्ष वाय. पी. कांबळे यांना शिवीगाळ व धमकी दिल्याप्रकरणी सध्याचे अध्यक्ष समीर शेख यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी संघटनेचे मादी माजी अध्यक्ष यशवंत कांबळे (रा. भाग्योदय सोसायटी, कुमठा नाका) यांनी याबाबत पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनावरून कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष समीर शेख (रा. हाजी हजरत खान चाळ, मुरारजी पेठ सोलापूर) यांच्याविरुद्ध सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हा प्रकार घडला संघटनेतून संघटनेतील जुन्या भांडणावरून आरोपी समीर शेख यांनी शिवीगाळ करून धमकी दिल्याचे कांबळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे. यावरून शेख यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याचबरोबर शेख यांच्याविरुद्ध आणखी एका महिलेने तक्रार दिलेली आहे. गेल्या आठवड्यात हा प्रकार घडला याबाबत विचारल्यावर शेख आणि हे आमच्यातीलच भांडण आहे सामोपचाऱ्याने प्रकरण मिटवणार असल्याचे सांगितले होते.  पण प्रकरण न मिटल्यामुळे त्यांच्या अडचणीत आणखी वाढ होणार आहे. आरोग्य कर्मचारी संघटनेच्या आजी-माजी पदाधिकाऱ्यांच्या भांडणाचे प्रकरण पोलिस ठाण्यापर्यंत गेल्यामुळे हे प्रकरण आणखीनच गंभीर बनले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *