सोलापूर : सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना खासदार करण्यात जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष व दक्षिण सोलापूरचे नेते सुरेश हसापुरे यांची भूमिका किंगमेकरची ठरली आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सर्व पक्ष मित्र व निवडणुकांवेळी चाणक्याची भूमिका निभावणाऱ्या हसापुरे यांना आता दक्षिण सोलापुरातून विधानसभेची संधी मिळणार अशी चर्चा सुरू झाली आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोदी लाटेमुळे दोन वेळा पराभव झाला या पराभवाचा वस्पा काढण्यासाठी तिसऱ्या वेळेस त्यांची कन्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूर लोकसभेचे आव्हान स्वीकारले. उमेदवारी त्यांचे नाव आल्यावर विरोधकांना ही निवडणूक सोपी वाटली. पण ‘एक नारी सबसे भारी” ठरली. प्रचार संपवून मध्यरात्री उशिरा घरी पोहोचणे व पहाटे पाच वाजता उठून कामाला लागणे, असा दिनक्रम आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारादरम्यान ठेवला. त्यामुळे मतदारसंघात तीन-तीन वेळा त्या मतदारापर्यंत पोहोचल्या लोकांच्या प्रश्नांचा वेध घेऊन पोट तिडकीने आपण ही भूमिका मांडू असा विश्वास लोकांना दिला.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी देखील लेकीला खासदार करण्यासाठी मोठी यंत्रणा कामाला लावली. आपल्या राजकीय अनुभवाचा उपयोग करून सर्व विरोधकांना एकत्र आणले. यासाठी स्वतःची वेगळी यंत्रणा लावली. या सर्व कामात त्यांच्याबरोबर जिल्हा काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष सुरेश हसापुरे यांची साथ होती. अजून कोण दूर राहिले आहे? याचे नाव सुशीलकुमार यांच्या कानात सांगण्याचे काम हसापुरे यांनी केले. हसापुरे यांची चाणक्यनीती यावेळी मोठी कामी आली. त्यामुळे दक्षिणमधील विरोधक पहिल्यांदाच एकत्र आले. त्यामुळे काँग्रेसची ताकद वाढली. केवळ दक्षिण सोलापूर मतदार संघ नव्हे तर अक्कलकोट, मोहोळ, उत्तर सोलापूर, शहर व मंगळवेढा- पंढरपूर मतदार संघातील काहींची लिस्ट त्यांनी तयार ठेवली. त्यामुळे काँग्रेसच्या प्रचारादरम्यानच विधानसभेचा उमेदवार म्हणून हसापुरे यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आणि आता त्या चर्चेवर शिक्कामोर्तब झाले आहे. लोकांच्या प्रश्नांचा ठाव घेणारा काँग्रेस उमेदवाराचा प्रचार महत्त्वाचा ठरला. पोलिंग बूथवर एजंट नसतानाही बऱ्याच ठिकाणी काँग्रेसला मोठे मताधिक्य मिळाले आहे, याचेच पदाधिकाऱ्यांनाही आत्ता आश्चर्य वाटत आहे.
हसापुरे यांची जुनी मैत्री