सोलापूर : सोलापूरचे पहिले आरटीओ म्हणून धाराशिवचे डेप्युटी आरटीओ गजानन नेरपगार यांची नियुक्ती झाली आहे.
सोलापूरचे डेप्युटी आरटीओ संजय डोळे निवृत्त झाल्यापासून गेल्या दोन वर्षापासून ही पोस्ट रिक्त होती. त्यामुळे सोलापूरचा पदभार अकलूजच्या डेप्युटी आरटीओ अर्चना गायकवाड यांच्याकडे देण्यात आला होता. यादरम्यानच राज्यातील काही डेप्युटी आरटीओ कार्यालयांचे विस्तारीकरण करण्यात आले. यामध्ये सोलापूरच्या डेप्युटी आरटीओ कार्यालयाला आरटीओ कार्यालयाचा दर्जा मिळाला. आत्तापर्यंत सोलापूर डेप्युटी आरटीओचे कार्यालय पुणे आरटीओच्या अंतर्गत येत होते. पण सोलापूर कार्यालयाला स्वतंत्र दर्जा मिळाल्यापासून अधिकाऱ्याची नियुक्ती झाली नव्हती. गजानन नेरपगार हे धाराशिव येथे डेप्युटी आरटीओ म्हणून कार्यरत होते. पदोन्नतीने त्यांची सोलापूरचे आरटीओ म्हणून नियुक्ती झाल्याचा आदेश परिवहन आयुक्त विवेक भिमानवार यांनी काढला आहे. त्यामुळे सोलापूर कार्यालयाला पहिला आरटीओ मिळाला आहे. यामुळे सोलापूर आरटीओ कार्यालयाची कार्यकक्षा आता वाढणार आहे. त्याचबरोबर सोलापूर कार्यालयातील विजय पाटील यांना धाराशिव डेप्युटी आरटीओचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. तसेच लातूर डेप्युटी आरटीओ कार्यालयातील सहाय्यक डेप्युटी आरटीओ आशिषकुमार अय्यर यांना अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.


More Stories
अभिनंदन: वारी विनावाद टेंडर, स्वच्छतागृह, जर्मन हँगरची सुविधा; क्रेडिट गोज टू कोहीणकर
सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत
पंढरपूर कॉरिडॉरचे काम कोणावरही अन्याय न करता योग्य पुनर्वसन करून पूर्ण करणार