सोलापूर : लोकसभेच्या निकालानंतर सोलापूरकडे पाठ फिरवलेल्या पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अखेर सोलापूरचा दौरा जाहीर केला आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे मंगळवारी सिद्धेश्वर एक्सप्रेसने मुंबईहून सोलापूरकडे दौऱ्यावर येणार आहेत. लोकसभा निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच ते सोलापूर भेटीला निघाले आहेत. या एकाच भेटीत त्यांनी प्रलंबित राहिलेल्या सर्व विषयांवर लक्ष केंद्रित केले आहे. यामध्ये आषाढी यात्रा नियोजनाबरोबरच पावसाळी विकास कामांच्या विभाग प्रमुखांच्या सर्व बैठका घेण्याचा बुधवारी दिवसभरात सपाटा राहणार आहे. दरम्यान सोलापूर व माढा लोकसभेच्या पराभवानंतर पालकमंत्री बदलण्याच्या हालचाली असल्याच्या चर्चा वाढल्या आहेत. यामध्ये माजी पालकमंत्री विजयकुमार देशमुख की आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा नंबर लागणार याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत

More Stories
सोलापूर झेडपीच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य केंद्रांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन
आषाढी वारी काळात दोन दिवसात पंढरपुरात 32 लाख वारकरी
Wari: कलेक्टर एस.कार्तिकेयन ठरले वारकऱ्यांसाठी देवदूत, हां खरंच वीर धरण ओरव्हफ्लो झाले अन् श्वास रोखला…