सोलापूर: मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या कार्यकारी अधिकारी संघटनेच्या अध्यक्षपदी सेवानिवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची बिनविरोध तर सचिवपदी भूषण राऊत यांची निवड करण्यात आली आहे. नुकतीच नागपूर येथे कार्यकारी अधिकारी संघटनेची सर्वसाधारण बैठक झाली. त्यामध्ये ही निवड करण्यात आली आहे.
परिवहन विभागातील मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक यांच्या कार्यकारी अधिकारी संघटनेची सर्वसाधारण बैठक ही नागपूर येथे पार पडली. या बैठकीला सुमारे 300 हून अधिक मोटार वाहन निरीक्षक व सहायक मोटार वाहन निरीक्षक उपस्थित होते.
सन 2022 मध्ये खरमाटे हे सेवानिवृत्त झाल्यानंतर परिक्षित पाटील यांनी या संघटनेचे अध्यक्षपद स्विकारले होते. परंतु, पाटील यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर हे अध्यक्षपद रिक्तच होते. त्या पदावर खरमाटे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच नुतन कार्यकारिणीदेखील निवडण्यात आली.
निवडण्यात आलेली नुतन कार्यकारिणी पुढीलप्रमाणे. अध्यक्ष – बजरंग खरमाटे., उपाध्यक्ष – सचिन पाटील(मुंबई विभाग), दिपक भोंडे(कोकण विभाग), विजयसिंह भोसले(पश्चिम महाराष्ट्र विभाग), अनिल केदार(उत्तर महाराष्ट्र विभाग), राजू नागरे(मराठवाडा विभाग), वैभव गुल्हाने(विदर्भ विभाग)., सचिव – भूषण राऊत., सहसचिव – योगेंद्र देशमुख, अजिंक्य गायकवाड, शितलकुमार कुंभार, संकेत गायकवड, तानाजी धुमाळ, अमोल कदम, नितीन अहिरे, उमेश बेडसे, गणेश विघ्ने, मन्मथ कुदळे, आनंद मोड, सागर ठोसरे., खजिनदार – विनोद सुंदरानी., प्रसिध्दी प्रमुख – रुक्मिणीकांत कळमणकर., स्विकृत सदस्य – प्रदीप वाघ, विकास माळवे, संदीप शिंदे, विशाल यादव, शिवानी नागरगोजे, राजन सरदेसाई, अमोल आव्हाड, शितल पाटील, भाग्यश्री पाटील, स्नेहल पाराशर, शशिकांत पाटील, प्रितम वाघ.
अधिकाऱ्यांच्या हक्कासाठी प्रयत्न
आरटीओ अधिकाऱ्यांची कार्यकारी संघटना ही सन 1973 पासून कार्यरत आहे. ही सर्वात जुनी संघटना आहे. आरटीओ अधिकाऱ्यांना कामकाजात येणाऱ्या अडचणी तसेच रस्ता सुरक्षेच्याबाबतीत काही नियमांची अंमलबजावणी करावयाची झाल्यास त्या कामांसंदर्भात सरकारशी समन्वय साधून कामकाज करणार असल्याचे खरमाटे यांनी सांगितले.