सोलापूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरी करताना घटस्फोटित शिक्षिका गरोदर राहिली व तिला मुलगाही झाला.  त्यानंतर घटस्फोटीत प्रमाणपत्राच्या आधारावर तिने आंतर जिल्हा बदलीचा लाभही घेतला. ही कहाणी उत्तरप्रदेश किंवा बिहार राज्यातील नाही तर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात घडलेला हा प्रकार आहे. संबंधित शिक्षकेने एका प्राध्यापकाशी केलेले लफडे ‘त्या” प्राध्यापकाच्या पत्नीने उघड केले आहे.

मित्रांनो, तुम्हाला आठवत असेलच दोन वर्षांपूर्वी करमाळा तालुक्यात कार्यरत असलेले ग्लोबल टीचर डीसले गुरुजी यांना अमेरिकेत पीएचडी करण्यासाठी जाण्याला रजा देण्यावरून किती मोठा गजब करण्यात आला होता. झेडपी शाळांचे नाव करण्यासाठी अमेरिकेला निघालेल्या या शिक्षकाला रजा देण्यासाठी शिक्षण विभागाने किती नाडले होते. पण मित्रांनो याच्या उलट स्थिती याच करमाळा तालुक्यातून उघड झाली आहे. सरकारी यंत्रणेचा नमुना काय असतो हे या कहाणीवरून उघड होत आहे. करमाळा तालुक्यात कार्यरत असलेल्या घटस्फोटीत शिक्षिकेने नगर जिल्ह्यात आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केला होता. पण या शिक्षिकेने या जिल्ह्यातील आपल्या जुन्या मित्रांबरोबर लफडे केले. तो मित्र नगर जिल्ह्यातील एका कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे. यातून ती गरोदर राहिली. तिला मुलगाही झाला. मुलाच्या नावाची नोंद तिने सरकारी दप्तरी या प्राध्यापकाच्या नावासह घेतली. नंतर अर्ज केल्याप्रमाणे तिला नगर जिल्ह्यात बदली मिळाली.

त्या प्राध्यापकाच्या पत्नीला ही बाब कळाली. आपल्या नवऱ्याचे लफडे उघड करण्यासाठी ती त्या कॉलेजवरही गेली. संबंधित सरकारी यंत्रणाकडे तिने याबाबत अर्ज केला. माझ्या पतीने पहिले लग्न झालेले असतानाही मैत्रिणीबरोबर गुपचूप दुसरे लग्न केले असा दावा तिने केला. पण त्या कॉलेजने तिच्या पतीचे एकतर्फी म्हणणे घेऊन तिची तक्रार फेटाळून लावली आहे.  त्यामुळे तक्रारदार महिलेने विद्यापीठाकडे धाव घेतली आहे. ती मैत्रीण घटस्फोटीत असतानाही तिने बदलीसाठी सरकारी यंत्रणेचा फायदा घेतला अशी तक्रार केली. त्यानंतर तिने विवाहित पुरुषाशी गुपचूप दुसरे लग्न केले आहे. सरकारी यंत्रणेने तिला पुरावे मागितले. त्यावर तिने त्या मुलाचा जन्म दाखला सादर केला व याबाबत कोर्टातही धाव घेतली आहे. त्या शिक्षिकेने सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाची फसवणूक केल्याची तक्रारही तिने शिक्षण अधिकाऱ्याकडे केली आहे.  यावर शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी करमाळा गटशिक्षणाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून सात दिवसात अहवाल सादर करण्याबाबत कळविले आहे.  संबंधित महिलेने करमाळा गटशिक्षणाधिकाऱ्याकडेही तक्रार केली होती. पण तिथे उडवाउडवीची उत्तरे दिली जात असल्याचे दिसून आले आहे. ती शिक्षिका ज्या शाळेवर कार्यरत होती त्या काळात ती गरोदर राहिली होती.  ही बाब तेथील मुख्याध्यापक व इतर शिक्षकांना कशी कळाली नाही व त्यांनी याबाबत आपल्या विभाग प्रमुख यांना कळविले होते का? आता हे पाहणे गरजेचे झाले आहे. त्या महिलेने विभागीय आयुक्तांकडेही तक्रार केल्यानंतर आता विभागीय चौकशी सुरू झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *