सोलापूर:अरे हे काय? सोलापूर शहर पोलिसांनी विजयपूर महामार्गावरील तपासणी नाक्याची बदललेली जागा पुन्हा आहे त्याच जागेवर नेली आहे. 14 वर्षांपूर्वी ठरलेली सोरेगाव जलशुद्धीकरण केंद्र जवळील जागाच तपासणी कामकाजासाठी सुरक्षित असल्याचे दिसून आले आहे.

सन 2012 मध्ये सोलापूर शहरात जड वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाल्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने शहरात दिवसा जड वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. पोलीस आयुक्तालयाने या बंदी आदेशाचा आत्तापर्यंत अंमल सुरू ठेवला आहे. जड वाहतूक बंदीचा अंमल करण्यासाठी सुरेगाव जल शुद्धी केंद्र जवळ शहर वाहतूक पोलिसांचा तपासणी नाका करण्यात आला होता. दरम्यान हत्तुर ते केगाव बायपास सुरू झाल्यानंतर शहरातील हैदराबादमार्गे येणारी जड वाहतूक वळवली गेली. त्यामुळे शहरात महामार्गावरून येणारी जड वाहने बंद झाली. तरीही पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव हा तपासणी नाका सुरूच ठेवला आहे.  परंतु गेल्या आठवड्यात हा तपासणी नाका सैफुल जवळील लक्ष्मी मंदिराजवळ आणण्यात आला होता.  त्यासाठी महामार्गाकडेला पोलिसांनी तंबूही ठोकला होता. पोलिसांचा हा तपासणी नाका शहराजवळ आल्यामुळे वाहनधारकांची गर्दी होऊ लागली. एसआरपी  कॅम्प कडून येणारे दुचाकीस्वार पोलिसांचा ससेमिरा चुकवण्यासाठी रॉंग साईडने वाहने घालण्यास सुरुवात केली होती. ‘सोलापूर समाचार” ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यामुळे धोका ओळखून पोलिसांनी हा नाका पुन्हा आहे त्याच ठिकाणी नेल्याचे सांगण्यात येत आहे. 14 वर्षांपूर्वी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे केलेल्या अंमलबजावणीत बदल करताना तशा परवानग्या घेणे आवश्यक असल्याचेही आता सांगितले जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *