1. सोलापूर :.पंढरपूर तहसीलमधील पुरवठा निरीक्षक  सदानंद नाईक यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी रेशन दुकानदार संघटनेने 15 ऑगस्ट पासून बेमुदत संप करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही वर्षांपूर्वी जिल्हा रेशन दुकानदार संघटनेने पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्या कारभाराची चांगलीच पोलखोल केली होती. पण वरिष्ठाच्या मध्यस्थिने पडदा टाकण्यात आला होता.मात्र नाईक यांच्या कारभारात कोणतीच सुधारणा होत नसल्याने दुकानदार चांगलेच कोंडीत अडकले आहेत.प्रशासनाच्या अनेक उपक्रमात रेशन दुकानदारांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. पुरवठा विभागाची दुसरी बाजू म्हटली जाणारे  रेशन दुकानंदाराच्या तक्रारीकडे मात्र प्रशासन जाणीवपूर्वक कानाडोळा करत असल्याचे जिल्हा संघटनेने आरोप केला आहे. काही दिवसापूर्वीच सोलापूर लोकसभा खासदार प्रणेती शिंदे यांच्या गावभेटीदरम्यान नागरिकांनिच या पुरवठा निरीक्षकाविरुद्ध तक्रारीचा पाढा वाचला होता. त्याप्रमाणे चौकशी समिती पण नेमन्यात आली होती. पण अद्यापपर्यत त्या चौकशी समितीचा अहवाल देखील बंद लखोट्यातच आहे. यावरून अनेकदा तक्रारी होऊनसुद्धा कागदोपत्रीचा फेरफार करून आपल्या कर्मचाऱ्याला पाठीशी घालत असल्याचे नागरिकांचा देखील आरोप आहे.दुकानदार असो किंवा नागरिक कोणाच्याच तक्रारीला प्रशासनाने न्याय न दिल्याने आता ह्या सर्व प्रकारला वैतागूनच ८ ऑगस्ट रोजी पुणे पुरवठा विभागाचे उप आयुक्त रमेश बेंडे यांना  सोलापूर जिल्हा रेशन दुकानदार संघटनेच्यावतीने पंढरपूर तालुक्यातील पुरवठा निरीक्षक सदानंद नाईक यांच्यावर निलंबनाची कारवाई न झाल्यास येत्या १५ ऑगस्ट पासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व रास्त भाव धान्य दुकानदार धान्य वाटप बंद करून संपावर जाणार असल्याचे निवेदन देण्यात आले.नाईक यांच्या विरोधात १८५ पानाचा निवेदन ऑनलाईन पुराव्यासह वरिष्ठाकडे दिल्याचे जिल्हा संघटनेने कळविले आहे. यावेळी राष्ट्रीय व राज्य फेडरेशनचे खजिनदार  विजय गुप्ता, जिल्हाध्यक्ष सुनिल पेंटर, अभिजित सडडो अ झोन अध्यक्ष, जुबेर खानमिया क झोन अध्यक्ष, हर्षल गायकवाड ड झोन अध्यक्ष तसेच जिल्हा संपर्क प्रमुख नितीन पेंटर उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *