सोलापूर : जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अरुण तोडकर यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या ओबीसी सेलच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
अरुण तोडकर यांनी गेली पाच वर्षे म्हाळुंग जिल्हा परिषद गटाचे सदस्य म्हणून काम पाहिले आहे.मोहिते -पाटील गटाचे ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. जिल्हा नियोजन समितीचेही ते सदस्य होते. जिल्ह्यातील अनेक प्रश्नांवर त्यांची आक्रमक भूमिका दिसून आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघातील उमेदवाराच्या प्रचारासाठी त्यांनी हिरारीने काम केले. या कामाची पावती म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष राज राजापूरकर यांनी तोडकर यांची सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

More Stories
बापरे… धो धो बरसणार परतीचा पाऊस
सोलापूर झेडपी स्थायी समितीचा दणका; आरोग्यातील 35 परिचराना मिळाली पदोन्नती
प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अंतिम यादीत आलेच पाहिजे ; ४ नोव्हेंबरला अंतिम मतदार यादी होणार प्रसिद्ध