December 5, 2025

Solapur Samachar

Latest Marathi News

शेवटी करून दाखवलं : पंचायत राज अभियानात सोलापूर झेडपी नंबर वन

सोलापूर : यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान सन 23-24 मध्ये पुणे विभागात सोलापूर झेडपी नंबर वन ठरली आहे. 

पुणे विभागाचे विकास उपायुक्त विजय मुळीक यांनी यशवंतराव चव्हाण पंचायतराज अभियानाचे गुणांकन जाहीर केले आहे. पुणे विभागात जिल्हा परिषदमध्ये सर्वाधिक गुण घेऊन प्रथम क्रमांक वर आहे तर पंचायत समित्यांमध्ये दुसऱ्या क्रमांकाचे गुण घेऊन पंढरपूर पंचायत समितीने द्वितीय क्रमांक पटकावला आहे. पंचायतराज अभियानात हे यश मिळवल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.