सोलापूर : जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्रमांक 1 या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीनंतर नूतन संचालकाची बैठक निवडणूक निर्णय अधिकारी आबासाहेब गावडे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यामध्ये डॉ.शत्रुघ्नसिंह माने यांची चेअरमन व सुरेश कुंभार यांची व्हाईस चेअरमन पदी बिनविरोध निवड झाली.

याप्रसंगी मार्गदर्शक पंडित भोसले, मावळते चेअरमन विद्यमान जेष्ठ संचालक विवेक लिंगराज, पॅनल प्रमुख दयानंद परिचारक, श्रीशैल देशमुख,भरतकुमार कदम आदी उपस्थित होते. निवडीनंतर अध्यासी अधिकारी आबासाहेब गावडे यांच्याहस्ते फेटा,पुष्पहार, रोप देऊन चेअरमन, व्हाईस चेअरमन यांचा सन्मान तदनंतर सर्व संचालक, श्रेष्ठी यांच्याकडून दोन्ही उभयतांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.निवडीनंतर जिल्हा परिषदेतील सर्व संघटनांच्यावतीनेही डॉ.माने व कुंभार यांचा शाल, रोप देऊन अभिनंदन करण्यात आले. पुढील कालावधीत सभासदाभिमुख व अधिक पारदर्शकतेचा कारभार, गृहनिर्माण प्रकल्प करण्याचे मानस डॉ. माने व कुंभार यांनी व्यक्त केला. याप्रसंगी संचालक विष्णू पाटील,शहाजहान तांबोळी, श्रीधर कलशेट्टी, विशाल घोगरे, तजमुल मुतवली,गजानन मारडकर,शिवानंद म्हमाने,किरण लालबोंद्रे, विकास शिंदे, चेतन वाघमारे,शिवाजी राठोड,विजयसिंह घेरडे,मृणालिनी शिंदे, श्वेतांबरी राऊत आदी उपस्थित होते. बैठक यशस्वीतेसाठी सचिव दत्तात्रय देशपांडे, अशोक पवार ,सुभाष काळे,विनोद कदम,जगदेवी अंजनालकर आदींनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *