सोलापूर : जिल्हा परिषदेच्या वीस वर्षाच्या इतिहासात पहिल्यांदा हे मोठे काम झाले आहे. जिल्हा परिषद, ग्रामपंचायत व पंचायत समिती स्तरावरील लेखापरीक्षणातील 332 त्रुटी काढून टाकण्यासाठी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली आहे, अशी माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी दिली.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 12 ते दिनांक 14 ऑगस्ट या कालावधीत महालेखाकार मुंबई यांचेकडून महाशिबीर आयोजीत करण्यांत आले होते.या शिबीरात उपमहालेखाकार जिष्णू जे राज, वरिष्ठ लेखापरिक्षा अधिकारी राघवेंन्द्र राऊत, मोहम्मद रजा, अनिल खरात उपस्थित राहून परिच्छेद निपटारा करणेकामी बहुमुल्य मार्गदर्शन केले.
जिल्हा परिषदेकडे सन 2005- 06 पासून ते सन 2023 अखेर परिच्छेद प्रलंबित असल्याने विशेष महाशिबीर आयोजीत केले होते. या शिबीरात जिल्हा परिषद व ग्राम पंचायत विभाग यांनी 322 प्रलंबित परिच्छेदापैकी 275 परिच्छेदांचा निपटारा करण्याची जिल्हा परिषदमधील संबधित अधिकारी व कर्मचारी यांनी उल्लेखनीय कामगीरी केलेली आहे. त्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी मोठया प्रमाणांत प्रलंबित असणारे परिच्छेदांचा निपटारा केलेने सर्वाचे विशेष कौतुक केले आहे.
महाशिबीर यशस्वी करण्यांस मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे,उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं) इशाधीन शेळकंदे,उपमुख्य लेखा व वित्त अधिकारी चंदकांत पाटील, सहाय्यक लेखाधिकारी हरीष म्हेत्रस, कनिष्ठ लेखाधिकारी,अंकुश खेलबुडे ,कनिष्ठ प्रशासन अधिकारी सिद्धराम बोरुटे यांनी विशेष परिश्रम घेतले. बांधकाम, स्वच्छ भारत मिशन, ग्रामपंचायत कडील वित्त विभागाचे कामे याविषयी अनेक त्रुटी होत्या. वीस वर्षात पहिल्यांदाच अशा त्रुटींचा निपटारा झाला आहे.