सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेच्या सन 2024 या वर्षातील जिल्हा परिषद सेस कृषी योजनेअंतर्गत तालुका निहाय 2451 लाभार्थ्यांची निवड सोडत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नेहरूनगर उत्तर सोलापूर येथील विद्यार्थ्यामार्फत लॉटरी पद्धतीने निवड करण्यात आली.
कृषी विभागाकडील तीन कोटी पंधरा लाख रुपयाचे विविध अवजारांसाठी 50 टक्के निधी अनुदान शेतकऱ्यांना उपलब्ध करण्यासाठी लॉटरीद्वारे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, जिल्हा निरीक्षक गटविकास अधिकारी बाळासाहेब वाघ व महेश पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. .याप्रसंगी सुरुवातीला कृषी विकास अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांनी जिल्हाभरातून प्राप्त अर्ज, उद्दिष्ट व लॉटरी निवड सोडत प्रक्रियेबाबत शेतकऱ्यांना व उपस्थितांना मार्गदर्शन केले.त्यामध्ये सर्वप्रथम दिव्यांग व महिला महिला शेतकरी यांची पाच टक्के प्रमाणे १२२ सोडत काढण्यात आली. नंतर २३५१ सर्वसाधारण लाभार्थ्यांची निवड जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या सभागृहात करण्यात आली .यासाठी जिल्हा कृषी अधिकारी सामान्य सागर बारवकर, मोहीम अधिकारी अशोक मोरे, सहा प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज,योजना सहाय्यक राजश्री कांगरे, कार्यालयीन अधीक्षक उमाकांत कोळी,रोहित शिंदे,महानंदा कुंभार, वर्षा अवधूर्ती यांनी परिश्रम घेतले.
या सोडतीमध्ये अक्कलकोट तालुक्यातील 802 अर्जातून 213, बार्शी 1993/ 210 करमाळा 2160 /195 माढा 1702/234 माळशिरस 1845/ 319 मंगळवेढा 1009 /186 मोहोळ 942/221 उत्तर सोलापूर 557 /142 पंढरपूर 1940 /259 सांगोला 1893 /253 दक्षिण सोलापूर 1043 /219 अशा एकूण 15886 प्राप्त अर्जातून 14 अवजारे व साहित्य योजनेतील 2451 लाभार्थ्यांची व उर्वरित प्रतीक्षाक्रमवारी लॉटरी पद्धतीने शेतीसाठी विविध अवजारे,पूरक यंत्रणा अनुदान देण्यासाठी निवड करण्यात आली. अत्यंत पारदर्शकतेने शेतकऱ्यांच्या उपस्थितीत सदरची लॉटरी सोडत काढल्याने शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले. या लॉटरी सोडतीसाठी तालुक्यातील कृषी अधिकारी व विस्तार अधिकारी यांनी शेतकऱ्यांना अर्जांच्याबाबतीत मार्गदर्शन व लॉटरीसाठी मोलाचे सहकार्य केले.
लॉटरीसाठी जिल्ह्यातून माहिती संकलन विस्तारधिकारी सचिन चव्हाण, अंबिका वाघमोडे ,हरूनपाशा नदाफ, मिथुन भिसे,मल्लिकार्जुन स्वामी ,ओम प्रकाश कोकणे, लक्ष्मण वंजारी, यांनी संकलन केले. लॉटरीसाठी प्राथमिक शाळा नेहरूनगर येथील उपशिक्षक अनिल थोरबोले यांचे विशेष सहकार्य लाभले. चौकट पूर्व संमती नंतर 21 दिवसाच्या आत म्हणजे 20 सप्टेंबर पर्यंत खरेदी पावती संबंधित पंचायत समिती कृषी विभागाकडे सादर करून अनुदान घेण्याची प्रक्रिया लवकर करावे असे आवाहन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी याप्रसंगी शेतकऱ्यांना केले.