सोलापूर : जिल्ह्यातील सर्व बँकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यातून काढण्यास कोणत्याही प्रकारची मनाई करू नये, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतुन हस्तांतरित केलेले आर्थिक लाभ (रक्कम) कोणत्याही थकित कर्जाच्या बदल्यात समायोजित केले जाऊ नये. ही रक्कम विशिष्ट उद्देशासाठी असून ती इतर कर्ज समायोजनासाठी वापरता येणार नाही. ही रक्कम त्यांच्या खात्यात वर्ग केल्यानंतर लाभार्थी महिलांना कोणत्याही थकबाकीच्या समायोजनामुळे रक्कम काढण्यास नकार देण्यात येऊ नये. काही लाभार्थ्यांकडे बँकेचे प्रलंबित असलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे बँक खाते गोठविण्यात आले असल्यास सदर बँक खाते तात्काळ सुरू करण्यात यावे व या योजनेतंर्गत लाभार्थ्यांना प्राप्त होणारी लाभाची रक्कम लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचना महिला व बाल विकास विभागाचे सचिव यांनी दिनांक 19 ऑगस्ट 2024 च्या पत्रानुसार दिलेल्या आहेत. तरी या सर्व सूचनांचे जिल्ह्यातील सर्व बँकांनी तंतोतंत पालन करावे. यासाठी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापक यांनी सर्व संबंधित बँकांना या विषयी सूचित करावे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
जिल्ह्यातील सर्व बँकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होणारी लाभाची रक्कम कोणत्याही प्रकारे समायोजित करून घेऊ नये. ही रक्कम संबंधित लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यातून काढण्यासाठी कोणत्याही प्रकारची अडचणी येणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी देऊन जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यासाठी हेल्पलाइन क्रमांक जाहीर करण्यात आलेले असून त्या हेल्पलाईन क्रमांकवर योजनेच्या अनुषंगाने कोणतीही अडचण आल्यास लाभार्थ्यांनी संपर्क साधावा, असेही त्यांनी सांगितले.
तालुकानिहाय हेल्पलाइन क्रमांक:आरडीशी मनीषा कुंभार
कार्यालयीन वेळेत महिला लाभार्थ्यांनी हेल्पलाइन क्रमांकाचा लाभ घेण्याचे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे.मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही शासनाची अत्यंत महत्त्वकांक्षी योजना आहे. या योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातून जवळपास सहा लाख अर्ज मंजूर झालेले आहेत.तसेच दि. 14 ऑगस्टपासून अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर माहे जुलै व ऑगस्ट या दोन महिन्याचे प्रत्येकी पंधराशे रुपयांप्रमाणे तीन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. परंतु या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना काही अडचणी येऊ शकतात. या अनुषंगाने संबंधित लाभार्थ्यांना अडचण निर्माण झाल्यास त्यांनी संबंधित तालुक्याच्या हेल्पलाइन क्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार यांनी केले आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने अडचणी सोडवण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील तालुकानिहाय हेल्पलाइन क्रमांक पुढील प्रमाणे-
माढा – मारुती ताटे, संरक्षण अधिकारी मोबा.नं.8999468993
करमाळा- 02182 -22 20357
मंगळवेढा – दारोळे, प्रकल्प अधिकारी, महिला व बालविकास: 99 60 24 72 75
सांगोला – 02187 -220218
पंढरपूर- 02186 -223556
मोहोळ – 02189 -232234
माळशिरस – 02185- 23 50 36
अत्तार , प्रकल्प अधिकारी महिला व बालविकास माळशिरस : 98 34 27 18 86.
अक्कलकोट- मिलिंद घाटगे,संरक्षण अधिकारी 9049113282, मृणाली शिंदे, विस्तार अधिकारी पंचायत समिती, अक्कलकोट 94 20 35 83 55
दक्षिण सोलापूर- मिलिंद घाटगे,संरक्षण अधिकारी : 90 49 11 32 82
बार्शी – शैलेश सदाफुले, विस्तार अधिकारी पंचायत समिती : 95 45 98 89 98, सुरज काटकर विस्तार अधिकारी, पंचायत समिती: 96 73 73 72 13
उत्तर सोलापूर – 0217- 2731014