सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची बुलढाण्यावरून दोन महिन्यात बदली का झाली? अशी चर्चा आता सोलापुरात सुरू झाली आहे. जंगम यांनी बुलढाणा सोडला असून शुक्रवारी ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून पदभार घेणार आहेत.
सोलापूर झेडपीचे नवनियुक्त सीईओ जंगम यांची 4 जुन 2024 रोजी बुलढाणा जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. त्यांनी 7 जुन 2024 ला बुलढाणा जिल्हा परिषद सीईओ पदाचा पदभार स्वीकारला होता. तीन महिन्यातच त्यांची बदली झाली आहे. तत्कालीन सीईओ भाग्यश्री विसपुते यांच्या बदलीनंतर बुलढाण्याचे भुमिपुत्र आयएस विशाल नरवाडे यांची नियुक्ती झाली होती. परंतू लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुन्हा त्यांची बदली करण्यात आली होती. त्यानंतर बी. एम. मोहन यांच्याकडे काही काळ पदभार देण्यात आला होता. 4 जुनला जिल्हा परिषद सीईओपदी कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली होती. परंतु दि. 29 ऑगस्टला त्यांची बदली सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्थानिक व जिल्ह्यातील तीन वर्ष कालावधी पूर्ण झालेल्या कार्यकारी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शासनाने गुरुवारी सात आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. त्यात बुलढाण्याचा सुपुत्र असल्याने जंगम यांची सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून दोन महिन्यातच बदली करण्यात आली तर सोलापूर जिल्हा परिषदेच्या सीईओ मनीषा आव्हाळे यांची जिल्ह्यात तीन वर्षाचा कालावधी पूर्ण झाल्याने पुणे स्मार्ट सिटीचे सीईओ म्हणून बदली करण्यात आली आहे.
कोण आहेत जंगम?
कुलदीप जंगम नांदेड जिल्हा परिषदेत सहाय्यक जिल्हाधिकारी होते आणि त्यांनी सिल्लोड, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महसूल विभागातही काम केले होते.जंगम हे 2018 च्या नागरी सेवा परीक्षेत IPS झाले. २०१४ मध्ये त्यांनी एनआयटी सिलचरमधून इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग पूर्ण केले