March 3, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

सोलापूरसह दहा शहरात ईडीचे छापे

सोलापूर : सक्त वसुली संचनालय अर्थात ईडीने सोलापूरसह देशातील दहा शहरात छापे मारल्याचे वृत्त राष्ट्रीय आकाशवाणीने शुक्रवारी सकाळी प्रसारित केले आहे.

राष्ट्रीय आकाशवाणी वरील सकाळी साडेआठच्या बातम्यांमध्ये ईडीची कारवाईची माहिती प्रसारित करण्यात आली आहे. यात ईडीने सोलापूरसह मुंबई, दिल्ली अशा देशातील दहा मोठ्या शहरांमध्ये छापे मारल्याचे सांगण्यात आले आहे. अमली पदार्थ तस्करीचीही मोठी कारवाई असल्याचे सांगितले जात आहे. दुबई स्थित जस्मितने अमली तस्करीचे जाळे लावल्याचे सांगितले जात असून या अनुषंगाने हे छापे मारल्याचे वृत्त आहे. सोलापुरात यापूर्वी चिंचोली एमआयडीसीतील  मोठा ड्रग्सचा  साठा जप्त करण्यात आला होता. त्यानंतर आता अमली पदार्थ विषयी ईडीने ही मोठी कारवाई केल्याचे सांगितले जात आहे. या कारवाईचा अधिक तपशील सांगण्यात आलेला नाही, मात्र या वृत्ताने सोलापुरात खळबळ उडाली आहे