सोलापूर: जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांची पुणे महानगरपालिका स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीच्या सीईओपदी नियुक्ती झाली आहे तर त्यांच्या जागी बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांची नियुक्ती झाली आहे.
मनीषा आव्हाळे यांची एक वर्षांपूर्वी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती झाली होती. यापूर्वी त्यांनी सोलापूर प्रांत म्हणून दोन वर्षे काम पाहिले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या आदेशाने तीन वर्षे कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या प्रस्तावित होत्या. त्यामध्ये सीईओ आव्हाळे यांची बदली झाली आहे. सीईओ आव्हाळे यांनी एक वर्षात जिल्हा परिषदेत ठळकपणे काम केले.
पहा बदलीचा हा आदेश…



More Stories
झेडपी अधिकाऱ्यांच्या सन्मानार्थ दलित पॅंथर महिला आघाडीचा आज मोर्चा
विस्तारअधिकारी मनोज म्हेत्रे यांना न्यायासाठी “कास्ट्राइब’चाही पुढाकार
गतवर्षीचे व्हिडिओ, पीपीटी पाहून जिल्हा परिषदेचे सीईओ कुशल जैन यांची आषाढी वारीची तयारी