सोलापूर : जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांचा गेल्या वर्षभराचा काळ तणावात्मक ठरला आहे. याला पीए हेही अपवाद नव्हते. त्यांनी तर स्वेच्छा निवृत्ती जाहीर केली होती पण नंतर काय झाले कोणास ठाऊक? त्यामुळे आता लोक विचारत आहेत, “पीए’च्या स्वेच्छा निवृत्तीचे काय झाले?

गेल्या वर्षी जूनमध्ये  जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून मनीषा आव्हाळे यांनी पदभार घेतला. त्यांचा पीए होण्यासाठी जिल्हा परिषदेत स्पर्धा लागली. ही चर्चा खूपच वाढल्याने आव्हाळे परीक्षाद्वारे सुधाकर माने- देशमुख यांची पीए म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे सुरुवातीला त्यांच्यामध्ये खूपच उत्साह दिसून आला. आव्हाळे यांनी प्रशासक राजच्या कडक नियमावलीला प्रारंभ केला. त्यामुळे अनेकांचा भ्रमनिरास झाला. याला पीए हेही अपवाद नव्हते. पीए स्वेच्छा निवृत्ती घेणार, अशी चर्चा जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांमध्ये सुरू झाली. त्यानंतर पुन्हा काय झाले कुणास ठाऊक? पीएचा चेहरा आनंदला आणि इकडे अधिकारी टेन्शनमध्ये आले. पीए अधिकाऱ्यांच्या दालनामध्ये दिसू लागले आणि अधिकारी कार्यालयातून गायब होऊ लागले. याचा पहिला दणका समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांना बसला. कारण लातूरचे झाले आणि कारवाई सोलापुरात झाली. या कारवाईमुळे इतर अधिकाऱ्यांना विनाकारण धास्ती वाटू लागली. त्यामुळे पीएच्या प्रोटोकॉलला नवसंजीवनी मिळाली. खालचे अधिकारी विभाग प्रमुखांना न भेटता थेट पीएच्या संपर्कात आले. त्यामुळे पीएच्या स्वेच्छा निवृत्तीची चर्चा आपोआप थांबली गेली. पण अधिकाऱ्यांमध्ये वाढत गेलेला दुरावा पीए थांबवू शकले नाहीत. उलट सीईओ च्या गैरहजेरीत घडलेल्या निगेटिव्ह गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आल्या. जे अधिकारी कामाने लोकप्रिय होत आहेत त्यांना जाणीवपूर्वक ब्रेक लावण्यात आला. त्यामुळेच आता नवीन सीईओ आल्यानंतर पीए बदलाबाबत चर्चा सुरू झाली आहे. हेच पीए राहिल्यास  अधिकाऱ्यांमध्ये निर्माण झालेला दुरावा कसा हटणार? अशी भीती कर्मचाऱ्यातून व्यक्त होत आहे. यापूर्वीचे सीईओ जिथे चुकले तिथे सांगणारे कोणीच नव्हते. त्यामुळे हाच पायंडा पुन्हा पडला तर जिल्हा परिषदेचे मोठे नुकसान होणार आहे, अशी कुजबुज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे. त्यामुळे गेल्या वर्षभरात घडलेल्या चुकीच्या बाबी नवीन सीईओ कुलदीप जंगम यांच्यासमोर गेल्या पाहिजेत अशा भावना कर्मचाऱ्यांनी मांडल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या मनातल्या या भावना या मालिकेद्वारे मांडण्याचा छोटासा हा प्रयत्न होता. नूतन सीईओ कुलदीप जंगम यांनी चुकीच्या बाबीची गंभीर दखल घेतल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे निश्चितच जिल्हा परिषदेत आगामी काळात चांगल्या गोष्टी घडणार आहेत याचे संकेत मिळत आहेत.

स्वच्छता, साक्षरता मोहीम

शासनाने सुरू केलेल्या साक्षरता मोहिमेकडे यापूर्वी दुर्लक्ष करण्यात आले. तरीही योजना शिक्षणाधिकाऱ्यांनी आहे त्या मनुष्यबळावर चांगले काम केले. या कामाची केंद्र शासनाने दखल घेतली. पण साक्षरता मोहीम यशस्वी होण्याबाबत जिल्हाधिकारी व सीईओस्तरावर बैठका झाल्या नव्हत्या. नूतन सीईओ कुलदीप जंगम यांनी साक्षरता मोहिमे बाबत बैठक घेऊन सर्वच गटशिक्षणाधिकाऱ्यांना दुसरा टप्पा प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर योजना शिक्षणाधिकारी कार्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या बाबी पुरवण्याच्याही त्यांनी सूचना दिल्या आहेत. त्यामुळे साक्षरता मोहिमेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा उत्साह दुणावला आहे. त्याचबरोबर स्वच्छता मोहिमेमध्येही  सीईओ जंगम यांनी लक्ष घातले आहे. शासनाचा हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी त्यांनी सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. जिल्हा परिषदेच्या सर्व कामांना पाठबळ राहील असा सल्ला त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्याने सर्वजण कामाला लागले आहेत.

2 thoughts on “सोलापूर झेडपीचे अधिकारी वर्षभर होते टेन्शनमध्ये”
  1. शिक्षण विभाग प्राथमिक लां गेली 20 वर्ष पासून सादिल निधी उपलब्ध नाही. त्यामुळे पूर्ण जिल्ह्यातील शिक्षण कार्यालयातील कर्मचाऱ्यांना आर्थिक झळ सोसावी लागते. याबाबत ही मुद्दा उपस्थित करा सारोळे साहेब

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *