सोलापूर : मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत या दोन्ही मराठ्यातील वैचारीक मतभेद मिटावा यासाठी मराठा क्रांती मोर्चाने पुढाकार घेतला आहे.

मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील हे मराठा समाजाला ओबीसीमधून सगेसोयरे यासह आरक्षण मिळावे या मागणीसाठी लढा देत आहेत. आता ही आरक्षणाची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान बार्शीचे भाजप पुरस्कृत आमदार राजेंद्र राऊत यांनी आपल्या पद्धतीने भूमिका घेतली आहे. मराठा योद्धा मनोज जरांगे- पाटील आणि बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत या दोन्ही मराठ्यातील वैचारीक मतभेद मिटावा यासाठी मराठा क्रांती मोर्चातील ज्येष्ठ समन्वयक दिलीप कोल्हे, दास शेळके, सुनील रसाळे यांनी पुढाकार घेत मनोज जरांगे पाटील आणि आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन सत्य परिस्थिती आणि वस्तुस्थिती याची मांडणी केली.

दोन्ही मराठा बांधवांची भूमिका एकच आहे गरजवंत मराठ्यांना ओबीसीतून सगे सोयऱ्यांसह आरक्षण मिळावे त्या दृष्टिकोनातून वाटचाल ही सुरू आहे. आज मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जालना येथील अंतरवली सराटी येथे मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बार्शी येथे आमदार राजेंद्र राऊत यांची भेट घेऊन एकोपा घडवण्यासाठी प्रयत्न केला आणि दोघांनीही यासाठी सकारात्मकता दर्शवली आहे.

यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे समन्वयक दिलीप कोल्हे यांनी समाज बांधवांनी एकमेकांवर टीकात्मक भाष्य करू नये. एकोप्याने राहावे आणि आपली आरक्षणाची गरजवंत मराठ्यांची लढाई यशस्वी करावी असे आवाहन केले.यावेळी मराठा क्रांती मोर्चा चे ज्येष्ठ समन्वयक दास शेळके, सुनिल रसाळे, विजय पोखरकर, बाळासाहेब सुरवसे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *