सोलापूर : कुणबी जात प्रमाणपत्रासाठी पडताळणी करून अहवाल देण्यासाठी 3 हजाराची लाच मागून तडजोड्यांची एक हजार घेण्याचे मान्य केल्याप्रकरणी करमाळा तालुक्यातील केतुरचा मंडल अधिकारी शंकर केकान याच्याविरुद्ध लाचलुस्मत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यातील तक्रारदारास कुणबी मराठा दाखला काढण्यासाठी कागदपत्राची पडताळणी करून हवी होती. तलाठी कार्यालयातील नोंदी तपासून पडताळणी दाखला देण्यासाठी त्यांनी केतुरचे मंडल अधिकारी शंकर केकान यांची भेट घेतली. पडताळणी करून दाखला देण्यासाठी केकान यांनी तीन हजाराची लाच मागितली. तडजोडी आणती एक हजार लाच घेण्याचे मान्य केले. यावर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला पथकाने सापळा रचला..मंडल अधिकारी केकानने लाच मागितलाच्या निष्पन्न झाल्यावर पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक यांच्या पथकाने करमाळा पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.