सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात आज महा स्वच्छता श्रमदान शिबिरात हजारो युवक व ग्रामस्थ सहभागी झाले. माचणूर येथे स्वत: सिईओ कुलदीप जंगम यांनी हातात झाडू घेऊन सिध्देश्वर मंदिर परिसराची साफसफाई केली.
सोलापूर जिल्ह्यात आज ११ तालुक्यातील १०१९ ग्रामपंचायती मध्ये स्वच्छता ही सेवा या उपक्रमा अंतर्गत महा स्वच्छता श्रमदान करण्यात आले. “*एक दिवस माझ्या गावा साठी*” या शिर्षा खाली हजारो हात श्रमदानासाठी राबले. ऐतिहासिक मंदिराचा परिसर, बस स्थानके व शासकीय इमारती व सार्वजनिक ठिकाणी जिल्ह्यात मोहिम राबविण्यात आली. जिल्हात बचतगटा सह, युवक , विद्यार्थी व ग्रामस्था सह शासकीय कर्मचारी यांनी स्वच्छतेबरोबर व्यापक स्वरूपाची जनजागृती करत पाच लाखा पेक्षा अधिक जिल्हा वासीयांना स्वच्छतेची शपथ दिली.
माचणूर येथे महास्वच्छता अभियान
सकाळी ८ वाजता सिईओ कुलदिप जंगम हातात हातमोजे घालून स्वच्छता मोहिमेसाठी सरसावले. देवास अर्पण करणे साठी आणलेले नारळाचे केसर व प्लास्टिक स्वत विलगीकरण करीत ग्रामस्थांना कचरा विलगीकरणाचे धडे दिले. प्लास्टिक कचरा विलगीकरण करीत पाच बॅगा प्लास्टिकने भरण्यात सिईओ स्वत स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले नंतर शेकडो लोक स्वयं स्फुर्तीने सहभागी झाले. सोबत प्रशालेतील विद्यार्थी सहभागी झाले होते. उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल, जाधव, मंगळवेढा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी योगेश कदम, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, विस्तार अधिकारी नरळे, ग्रामसेवक गोरख जगताप, सरपंच साधना तानाजी डोके, तानाजी डोके, पाणी व स्वच्छता विभागातील सचिन सोनवणे, शंकर बंडगर, प्रशांत दबडे, महादेव शिंदे यांचे सह ग्रामस्थ विद्यार्थी उपस्थित होते. एक दिवस माझ्या गावा साठी या उपक्रमा अंतर्गत हजारो लोक मोहिमेत सहभागी झालेबद्दल अभिनंदन करीत २ आक्टोबरपर्यंत ही स्वच्छता मोहिम सुरू राहणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्ती पर्यंत स्वच्छतेचा संदेश या निमित्ताने गेला आहे. स्वच्छता ही केवळ अभियाना पुरती ठेवू नका त्यात सातत्य राहू द्या. ओला व सुका कचरा चे विलगी करण करा. सुका कचरा देखील विलगीकरण करणे शक्य आहे. त्या साठी. डस्टबीन चा वापर करा. लोकांना एकदा सवय होणे गरजेचे आहे. स्वच्छतेचे सातत्य टिकवून ठेवा असे आवाहन जिल्ही परिषदेचे सिईओ कुलदीप जंगम यांनी केले.
ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथमा
माचणूर येथे स्वच्छता मोहिमेत सहभागी झालेल्या ग्रामस्थांना सिईओ जंगम यांनी स्वच्छतेची शपथ दिली. उप मुख्य कार्यकारी अमोल जाधव व गटविकास अधिकारी योगेश कदम यांनी मनोगत व्यक्त केले. जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव यांनी स्वच्छतेच्या शपथेचे वाचन केले. जिल्ह्यात ११ पंचायत समिती अंतर्गत सर्व गावातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, अंगणवाडी व ग्रामस्थांना स्वच्छतेची शपथ देणेत आली.
*हजारो टन कचराचे विलगीकरण..!*
………………….
जिल्ह्यात स्वच्छता मोहिमे अंतर्गत जमा झालेले कचराचे विलगीकरण करीत प्लास्टिक संकलन केंद्रात प्लास्टिक कचरा व रिकामे पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक पिशव्या जमा करणेत आले आहेत. आबाल वृध्दा पासून विद्यार्थी या मोहमेत सहभागी झाले होते. उप मुख्यकार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांचे सह विभाग प्रमुख यांनी परिश्रम घेतले.