सोलापूर : दक्षिण सोलापूर मतदार संघ व भाजपशी सोमनाथ वैद्य यांचा संबंध काय? असा सवाल हद्दवाढ भागातील कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहर दक्षिण पूर्व मंडलमधील हद्दवाढ भागाच्या विकासासाठी आ. सुभाष देशमुख यांनी आजपर्यंत भरीव निधी दिला आहे. प्रभाग क्र. 19 मध्ये रस्ते, पाणी, लाईट, पाईपलाईन आदी नागरी सुविधांसाठी देशमुख यांनी 22 कोटींपेक्षा जास्त निधी देत या भागाचा चौफेर विकास करत नागरि सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. याशिवाय केंद्र शासनाच्या अमृत योजने अंतर्गत 130 कि.मी.ची भुयारी गटार योजना हद्दवाढ भागातील देसाईनगर ,शांतीनगर , विनायकनगर, श्रमजीवी नीलमनगर, आशानगर, नवलेनगर, स्वागतनगर, माळीनगर, ताई चौक, आकाशवाणी परिसर, गवळी वस्ती, नेताजी शाळा, कलप्पा नगर, बोळकोटे नगर, नक्कावस्ती,जमादारवस्ती, नीलमनगर, एमआयडीसी इ. भागात 35 कोटी रुपये निधी आ. सुभाष देशमुख यांनी विशेष प्रयत्नाने हद्दवाढ भागासाठी आणला. नलिमनगरसह हद्दवाढ भाग ड्रेनेजलाईन काम प्रगतीपथावर आहे.

पण पक्षातील काही माजी नगरसेवक, कार्यकर्ते यांनी आपल्या वैयक्तीक स्वार्थासाठी आ. सुभाष देशमुख यांचेवर बिनबुडाचे आरोप केले आहेत.पण विकासासाठी हद्दवाढ भागातील सुजाण मतदार कायमच आ. सुभाष देशमुख यांचे पाठिशी आहे. प्रभाग 19 मध्ये आ. सुभाष देशमुख यांच्याकडून काही कामं झालं नाही असे कारण देत सोमथन वैद्य यांना काही मंडळींनी पाठिंबा दिला आहे. परंतू वस्तूस्थिती नाकारत त्यांनी हे आरोप केले आहेत. आमचे त्यांना आवाहन आहे की त्यांनी प्रत्यक्ष येवून काम पाहून मगच बोलावे. सोमनाथ वैद्य यांचा दक्षिणच्या विकासात काहीही सहभाग नाही, सोलापूर भाजपाशी कोणताही संबंध नाही. तरी त्यांना आगामी विधानसभेसाठी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी द्यावी यासाठी श्रीनिवास करली, राजश्री अनिल चव्हाण, वरलक्ष्मी श्रीनिवास पुरूड, राजश्री अशोक बिराजदार, संतोष भोसले, जुगनबाई आंबेवाले आदींनी शिफारस दिली. कोणी कोणाला पाठिंबा द्यावा हा ज्याचा त्याचा वैयक्तीक प्रश्न आहे. पण स्थानिक आमदार सुभाष देशमुख यांनी 2014 पासून हद्दवाढ भागाचा नियोजपूर्वक विकास केला असून त्याकडे जाणीवपर्वक दुर्लक्ष करत ही मंडळी केवळ स्वतचा सार्थ साधण्यासाठी आ. सुभाष देशमुख यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत आहेत. पक्षाच्या वरिष्ठांनी या घटनेची दखल घेत या मंडळींवर कारवाई करावी अशी मागणी हद्दवाढ भागातील कार्यकर्त्यांकडून होत आहे. या पत्रकार परिषदेस बसवराज केंगनाळकर, व्यंकटेश कोंडी, नागनाथ शिवसिंगवाले, अर्जुन जाधव, जगदीश नागमल, लक्ष्मण यलदंडी, सतिश माळवे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *