सोलापूर : जिल्हा परिषद कृषि विकास अधिकारीपदी हरिदास हावळे. सोलापूर जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी पदी सहायक संचालक रामेती,कोल्हापूर येथून पदोन्नतीने महाराष्ट्र कृषी सेवा गट अ कृषी उपसंचालक संवर्गात हरिदास हावळे यांची नियुक्ती कृषी विकास अधिकारी पदावर शासन आदेशाने दि.25 सप्टेंबर 2024 अन्वये जिल्हा परिषद, सोलापूर येथे नियुक्ती करण्यात आली.

कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे यांच्या सेवा निवृत्तीने रिक्त झालेल्या पदावर त्यांची नियुक्ती झाली आहे. गुरुवारी कार्यालयीन वेळेत मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मान्यतेने सागर बारवकर यांच्याकडून कृषी विकास अधिकारी पदाचा पदभार हावळे यांनी घेतला. यावेळी कार्यालयीन अधीक्षक विवेक लिंगराज व इतर अधिकारी उपस्थित होते. हावळे हजर झाल्यानंतर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी  स्मिता पाटील यांची भेट घेतली. कृषि विभागाचेवतीने त्यांचा फेटा व रोप देऊन अधिकारी व कर्मचारी यांनी स्वागत केले.  हावळे यांची लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र कृषी सेवा वर्ग दोन पदी राज्यात प्रथम क्रमांकाने निवड झाली होती.त्यानी यापूर्वी सन 2013 ते 2018 या कालावधीत विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर कार्यालय येथे तंत्र अधिकारी या पदावर, त्यानंतर सन 2018 ते 20 कालावधीत तालुका कृषी अधिकारी ,करवीर येथे आणि 2020 ते सप्टेंबर, 2024 कालावधीत प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती), कोल्हापूर येथे चार वर्षे झाली आहे. पदोन्नती वर्ष 2023-24 अंतर्गत सेवा पदोन्नतीने जिल्हा परिषद, सोलापूर येथे कृषी विकास अधिकारी या पदावर रुजू झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *