सोलापूर झेडपीला मिळाले नवीन 59 ग्रामसेवक
औषध निर्माता पदावर निवड झालेल्या तिघांनी मारली दांडी

सोलापूर : राज्य शासनाने राबविलेल्या नवीन कर्मचारी भरती प्रक्रियेत सोलापूर जिल्हा परिषदेला नवीन 59 ग्रामसेवक मिळाले आहेत.
सोलापूर जिल्ह्यात 1हजार 24 ग्रामपंचायत आहेत. जिल्हा परिषदेकडे आजमितीला ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकाऱ्यांची सुमारे 700 पदावर नियुक्ती होती. बरीच पदे रिक्त असल्याने एका ग्रामसेवकाला दोन ग्रामपंचायतीचा पदभार सांभाळावा लागत होता. अशा काही ग्रामपंचायतीवर शास्ती व इतर चौकशामध्ये निलंबनाची कारवाई झाल्यामुळे रिक्त पदांची संख्या वाढली होती. अशात सरकारने जिल्हा परिषदेच्या रिक्त जागांची पदभरती जाहीर केली. परीक्षा द्वारे निवड झालेल्या उमेदवारांची यादी यापूर्वी जाहीर झाली होती. पत्नी आहे प्राधान्याने निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी करून गुणवत्ता व आरक्षणानुसार ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या उपस्थितीत नियुक्त्या देण्यात आल्या. 69 रिक्त पदासाठी गुणवत्ता यादीनुसार उमेदवारांची निवड झाली होती. यातील दहा जणांनी दांडी मारली आहे. त्यामुळे 59 जणांना नियुक्ती देण्यात आल्याची माहिती प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी दिली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील रिक्त जागांसाठी भरती घेण्यात आली आहे. यात औषध निर्माता साठी निवड झालेल्या तीन उमेदवारांनी दांडी मारल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली. बुधवारी आरो सेवक पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना समायोजनाद्वारे नियुक्त्या देण्यात येत आहेत.