सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून आज दि. ७ आॕक्टोंबर रोजी २० टक्के मागासवर्गीय कल्याण निधी व ५ टक्के दिव्यांग कल्याण निधीअंतर्गत एकुण ९५० लाभार्थ्यांची सोडत पध्दतीने निवड करण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या सोडत कार्यक्रमाप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर व जिल्हा समाजकल्याण अधिकारी अमोल जाधव यांच्यासह विस्तार अधिकारी स्वाती गायकवाड , कनिष्ठ सहाय्यक नानासाहेब लोखंडे आदी कर्मचारी उपस्थित होते.जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडून मागासवर्गीयांसाठी शेळीगट,कडबाकुटटी,५ एच पी मोटर, मुले व मुलींना सायकल,ताडपत्री व दिव्यांगांसाठी ई – रिक्षा,शेळीगट या योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात आले होते.यासाठी जिल्हयातुन एकुण ५३९३ अर्ज आले होते.यावेळी अनुदानीत वसतीगृहातील २ मुलांच्याहस्ते तालुकानिहाय उदिदष्टानुसार लाभार्थींचे यादीनुक्रमांकानुसार चिठठया काढून लाभार्थी निवड करण्यात आली आहे.यावेळी नागनाथ शेंडगे, राहुल खटके व इतर लाभार्थींचे समक्ष लाभार्थी निवड करण्यात आली.

More Stories
पालकमंत्री गोरे यांच्याहस्ते मिळणार सोलापूर झेडपी पदाधिकाऱ्यांना नव्या गाड्या
बापरे… उत्तर सोलापुरात सरप्राईज व्हीजिटमध्ये झेडपी शाळांचे मुख्याध्यापक दिसले गायब
सोलापूर झेडपीच्या आरोग्य विभागात टेंडरवरून कंत्राटी कर्मचारी, लेखाधिकार्यात तु तू मै मैं..