सोलापूर : राज्याच्या मुद्रांक विभागाने 14 ऑक्टोबरपासून मुद्रांक शुल्कात काही महत्त्वाचा बदल केला आहे. त्यामुळे आता आपल्याला शंभर रुपयाचा स्टॅम्प विसरावा लागणार आहे.
मुद्रांक विभागाने साध्या प्रतिज्ञापत्रालासुद्धा ही आता पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेणे बंधनकारक केले आहे. यापूर्वी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर होणारे अनेक कामे आता 14 ऑक्टोबर पासून पाचशे रुपयांच्या स्टॅम्पवर होणार आहेत. शासनाने स्टॅम्प ड्युटी पाचपट वाढविली आहे. गरिबांना भाडेकरार, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रतिज्ञापत्र द्यावे लागते. आता असे प्रतिज्ञापत्र देण्यासाठी पाचशे रुपयाचा स्टॅम्प घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता लवकरच शंभर रुपयाचा स्टॅम्प नामसेस होणार आहे. विशेष म्हणजे यापूर्वी पीक कर्जासाठी त्यांची गरज लागणार नाही अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. पण बँकांमध्ये शंभर रुपयाचे दोन स्टॅम्प घेतले जात आहेत. आता पाचशे रुपयाचे दोन स्टॅम्प द्यावे लागणार आहेत. मुद्रांक वाढीचा सर्वात मोठा फटका गरिबांना बसणार आहे. शासनाने मुद्रांक दरात केलेला बदल पुढीलप्रमाणे आहे.