सोलापूर : शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आरपीआय (ए) महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या प्रचारार्थ जुनी मिल चाळीमध्ये कोठे परिवाराच्यावतीने प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी होम टू होम प्रचार अभियानांतर्गत घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधण्यात आला.

यावेळी उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या मातोश्री सुहासिनी कोठे म्हणाल्या, भाजप आणि महायुतीचे उमेदवार असलेले देवेंद्र कोठे यांचा जन्म जुनी मिल चाळ येथे झाल्यामुळे या चाळीशी कोठे परिवाराचा जुना ऋणानुबंध आहे. या चाळीतील रहिवासी आणि कोठे परिवार मिळून जणू एक कुटुंबच आहे. त्यामुळे जुनी मिल चाळीतील रहिवाशांचा भक्कम पाठिंबा देवेंद्र कोठे यांच्या पाठीशी राहील याचा ठाम विश्वास आहे. जुनी मिल चाळ येथे कोठे परिवाराकडून राबविण्यात आलेल्या गृहसंपर्क अभियानावेळी नागरिकांनी त्यांचे जोरदार स्वागत करीत देवेंद्र कोठे यांनाच निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला. देवेंद्र कोठे यांनी गेली १० वर्षे नगरसेवक म्हणून केलेले काम तसेच विकासाची त्यांची दूरदृष्टी हे दोन्ही मुद्दे विचारात घेऊन जुनी मिल चाळीतील मतदार देवेंद्र कोठे यांनाच निवडून देतील असे नागरिकांनी याप्रसंगी सांगितले.

या गृहसंपर्क अभियानात संगीता कोंड्याल, सुहासिनी कोठे, गीता कोठे, मंजुळा कोंड्याल, अक्षय कोथिंबिरे, सूर्या भगत, सुरेंद्र शिंदे, संजय जाधव, दादा नांदेवाडीकर, श्रीनिवास कोटा, शिंदे, मोरे आदी सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *