सोलापूर : सोलापूरच्या विकासात मोची समाजाचे योगदान मोठे आहे. मोची समाज भाजपासोबत आल्याने शहर मध्य विधानसभा मतदारसंघात भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या विजयाचा मार्ग आणखी सुकर झाला असून देवेंद्र कोठे यांचा विजय निश्चित आहे, असा विश्वास केंद्रीय सहकार आणि नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला.

शहर मध्य विधानसभा निवडणुकीसाठी श्री जांबमुनी मोची समाजाचा मेळावा शनिवारी अब्दुलपुरकर मंगल कार्यालयात उत्साहात झाला. यावेळी व्यासपीठावर भाजपाचे विधानसभा निवडणूक महाराष्ट्र सहप्रभारी रघुनाथ कुलकर्णी, माजी महापौर किशोर देशपांडे, शहर अध्यक्ष नरेंद्र काळे, मोची समाज अध्यक्ष आणि माजी स्थायी समिती सभापती देवेंद्र भंडारे, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सरचिटणीस रोहिणी तडवळकर, माजी नगरसेवक जेम्स जंगम, मोची समाज लष्कर विभागाचे अध्यक्ष करेप्पा जंगम, शहर युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष अंबादास करगुळे, नागनाथ कासलोलकर, बाबुराव संगेपांग, माजी नगरसेविका सरस्वती कासलोलकर, वैष्णवी करगुळे, मीनाक्षी कंपली, माजी स्थायी समिती सभापती सिद्राम अट्टेलुर, भाजपा एस.सी. मोर्चाचे शहर अध्यक्ष मारेप्पा कंपली, राजू अलकोड, कुमार जंगडेकर, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, साधना संगवे, भीम आसादे, अनंत गोडलोलू, डॉ. योगेश पल्लोलू, कुमार कांती उपस्थित होते.

केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, मोची समाजाच्या महामंडळाची मागणी तसेच शाळेच्या जागेची मागणी आगामी काळात सोडवण्यात येईल. मोची समाजाने वर्षानुवर्षे काँग्रेसचे एकनिष्ठेने काम केले परंतु काँग्रेसकडून मोची समाजाला न्याय मिळाला नाही. भारतीय जनता पार्टीत मोची समाजाचा मानसन्मान राखला जाईल. तसेच लोकप्रतिनिधित्वही देण्यात येईल. निष्ठेचा विचार भारतीय जनता पार्टीमध्ये होतो. सर्वसामान्य कार्यकर्ता ही भाजपाची सर्वात मोठी ताकद आहे. सर्वसामान्य माणसाचे जीवन समृद्ध करण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भूमिका आहे. हीच भूमिका घेऊन आगामी काळात महाराष्ट्रातील महायुती सरकार मोची समाजासह सर्व समाजाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी कार्यरत राहणार आहे.

उमेदवार देवेंद्र कोठे म्हणाले, ज्या मोची समाजामुळे काँग्रेस निवडणूक जिंकत होती, त्या मोची समाजाचा काँग्रेसने केवळ वापर केला. परंतु आगामी काळात महायुती सरकारकडून मोची समाजासाठी शहरात श्री जांबमुनी महाराजांच्या नावाने भव्य भवन बांधण्यात येईल. तसेच महामंडळासह समाजाच्या इतर प्रश्नांचीही सोडवणूक करण्यात येईल. एमआयएम सारख्या जातीयवादी, विषारी पक्षाला रोखण्यासाठी तसेच विकासाबरोबरच धर्मरक्षण, राष्ट्ररक्षण करण्यासाठी भाजपा महायुती हा सर्वात सक्षम पर्याय आहे. यंदाच्या निवडणुकीत शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील मतदारांनी हिंदू एकतेचे दर्शन घडवावे, असे आवाहनही उमेदवार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी केले. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे,  समाजाचे अध्यक्ष देवेंद्र भंडारे, भाजपा एससी मोर्चाचे शहर प्रमुख मारेप्पा कंपली आदींनी मनोगते व्यक्त केली.

 

आणखी 3 माजी नगरसेवकांचा प्रवेश

माजी नगरसेवक अनिल पल्ली, सुरेश तमशेट्टी, संजीवनी कुलकर्णी तसेच युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष प्रशांत पल्ली यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत याप्रसंगी भारतीय जनता पार्टी प्रवेश केला. यामुळे शहर मध्य मध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *