सोलापूरनिवडणूकराजकीय

अरे हे काय.. दिलीप माने अपक्षाच्या तर त्यांचे कार्यकर्ते भाजपच्या गोटात

सोलापूर : दक्षिण विधानसभा मतदारसंघात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत.माजी आमदार दिलीप माने यांच्या हद्दवाढ भागातील माजी नगरसेवकांनी आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा दिला आहे. यामध्ये नागेश ताकमोगे, दादाराव ताकमोगे यांच्यासह अनेकांचा समावेश आहे. गेल्या दोन दिवसांपासून दिलीप माने हे अपक्ष उमेदवार धर्मराज काडादी यांच्या प्रचारात सक्रिय आहेत. मात्र माने गटाचे कार्यकर्ते मात्र आमदार सुभाष देशमुख यांच्या संपर्कात असल्याचे दिसून येत आहे.

जुळे सोलापुरातील माने गटाचे माजी नगरसेवक नागेश ताकमोगे, दादाराव ताकमोगे, परिवहनचे माजी सदस्य नितीन भोपळे, ब्रह्मदेव दादा माने बँकेचे माजी संचालक आनंदराव देठे, सचिन चौधरी, विलास लोकरे, शाम कदम, लक्ष्मण जाधव, शिवसेनेचे जितेंद्र पवार आदींनी आता आमदार सुभाष देशमुख यांना सहकार्य करण्याचा निर्णय घेतलेला आहे. या सर्व पदाधिकाऱ्यांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मनीष देशमुख, आणि रोहन देशमुख हेही उपस्थित होते. काँग्रेसने दिलीप माने यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र एबी फॉर्म असतानाही माने यांना न दिल्यामुळे सर्व समर्थक प्रचंड संतापले होते. अखेर त्यांनी आमदार सुभाष देशमुख यांना आपला पाठिंबा देण्याचे जाहीर केले. आम्ही दिलीप माने यांच्यासाठी गेल्या वर्षभरापासून तयारी करत होतो मात्र पक्षाने एबी फॉर्म दिला नाही. काँग्रेसकडून दिलीप माने आणि कार्यकर्त्यांची फसवणूक झाली आहे. आता शांत बसण्याऐवजी फसवणूक करणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी आम्ही आमदार सुभाष देशमुख यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे विलास लोकरे आणि नागेश ताकमोगे यांनी सांगितले. यावेळी सर्व पदाधिकाऱ्यांनी आमदार सुभाष देशमुख यांच्यासह मनीष देशमुख आणि रोहन देशमुख यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केला.आमदार सुभाष देशमुख यांनी सर्वांचे स्वागत केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button