लोकसभेच्या भत्त्यासाठी तलाठ्यांचे काम बंद आंदोलन

सोलापूर : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या कामकाजाचा अतिरिक्त भत्ता मिळावा म्हणून जिल्ह्यातील तलाठ्याने दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे आणली आहेत.
लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणूकही झाली. पण लोकसभा निवडणुकीचे कामकाज केलेल्या महसूल कर्मचाऱ्यांना अतिरिक्त भत्ता देण्यात आलेला नाही. हा भत्ता तात्काळ कर्मचाऱ्यांना वितरित करावा व तलाठ्यांना लॅपटॉप, स्कॅनर व प्रिंटर द्यावा, साझा पुनर्रचनेनुसार साझा फोड करणे सह ग्राम महसूल अधिकारी यांची सेवा जेष्ठता यादी प्रसिद्ध करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी ग्राममहसूल अधिकारी ( तलाठी ) व मंडल अधिकाऱ्यांनी गेल्या दोन दिवसापासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. तलाठ्याच्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष झाल्यामुळे महसूल कर्मचाऱ्यांमधून त्रिव्र नाराजी व्यक्त होत आहे. तलाठ्यांच्या काम बंद आंदोलनामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे अडली आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन मार्ग काढावा अशी मागणी होत आहे.
उत्तर सोलापूर तालुक्यातील सर्व तलाठी व मंडल अधिकारी काम बंद आंदोलन करीत आहेत. आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांनी तहसीलदार निलेश पाटील यांना दिले आहे. उत्तर सोलापूर ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष अमोल शिंदे, मिलिंद पाटील, सोमेश्वर पाटील, सोमनाथ गवळी, देवानंद करवीर, प्रवीण जारपाल, पांडुरंग हिवरकर, वर्षा थोरात, अनिता कदम, आरती देशमुख, वैष्णवी कोथिंबीरे यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. संघटनेचे सल्लागार संतोष कांबळे, सारिका बाबर, दीपक कावळे, तुकाराम माने, दत्ताकुमार लाळे, संघटक अस्लम शेख, देवराज गायकवाड, गीतांजली जाधव, विठ्ठल केरे, मुशीर हकीम, जनार्दन गडदे, शुभम घोडके महमूद काझी, मिथाली चौगुले, दामा मॅडम, रविराज भूमकर, अशोक राठोड यांच्यासह सर्व ग्राम महसूल अधिकारी व मंडल अधिकारी उपस्थित होते.