साक्षरता कार्यशाळेतील साहित्यकृती पाहून भारावले सीईओ कुलदीप जंगम

सोलापूर : केंद्रशासन पुरस्कृत उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रम अंतर्गत शिक्षणाधिकारी (योजना) जिल्हापरिषद सोलापूरच्यावतीने आयोजित जिल्हास्तरीय उल्हास मेळाव्यात भरविण्यात आलेल्या साक्षरता साहित्यकृती पाहून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम हे भारावून गेले.
बाळे येथील ज.रा. चंडक प्रशालेत बुधवारी उल्हास मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या उल्हास मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते झाले. यावेळी माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, चंडक प्रशालेचे अध्यक्ष सचिन ठोकळ उपस्थित होते. यावेळी सीईओ कुलदीप जंगम यांनी उल्हास कार्यक्रम दालनाचे उद्घाटन केले. सोलापूर जिल्हातील अकरा तालुके व म. न. पा. सोलापूर अशी बारा दालने तयार करून यामध्ये साक्षरतेच्या विविध विषयासंबंधीत साहित्यांची मांडणी करून प्रदर्शन भरणवण्यात आले होते. यामध्ये डिजीटल साक्षरता, वित्तीय साक्षरता, वाचन लेखन, गणितीय संकल्पना, आर्थिक व्यवहार, इत्यादि विषयावरील अध्ययन साहित्याची मांडणी केली होती. मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दालनांतील साहित्य पाहून आयोजकांचे कौतुक केले व जिल्ह्यात साक्षरतेचा उपक्रम चांगल्या प्रकारे सुरू असल्याबाबत समाधान व्यक्त केले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक योजना शिक्षणाधिकारी सुलभा वटारे यांनी केले. प्रास्ताविकातून केंद्रशासनाच्या नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील उल्हास अभियानाच्या प्रगतीचा मागोवा त्यांनी सादर केला. तसेच या कार्यक्रमात असाक्षरांना साक्षर करण्याचे सुरु असलेले प्रयत्न कौतुकास्पद असल्याचे म्हटले. माध्यमिक शिक्षण अधिकारी सचिन जगताप यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रमात सोलापूर जिल्हा हा राज्यात अग्रेसर असल्याबाबत व त्याबददल सोलापूर जिल्ह्याचा राज्यात झालेल्या गुणगौरवाचे कौतुक केले.
याप्रसंगी डॉ. प्रभाकर बुधाराम, शशिकांत शिंदे (डायट अधिव्याख्याता) यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी नवभारत साक्षरता कार्यक्रमाचा तालुक्याचा प्रगती अहवाल संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सादर केला. नवभारत साक्षरता कार्यक्रमात उत्कृष्ट कार्य करणारे गटशिक्षणाधिकारी, विस्तारअधिकारी, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक, स्वयंसेवक व नवसाक्षरांचा प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते सन्मान केला गेला. यानंतर नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत तालुकास्तरापर्यंत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या नवसाक्षर, स्वयंसेवक, शिक्षक, केंद्रप्रमुख, विस्तारअधिकारी यांचे चर्चासत्र संपन्न झाले. या चर्चासत्राचे संचालन जीवराज खोबरे, संजय डोके व डॉ. नागनाथ येवले यांनी केले. या चर्चासत्रात विस्तार अधिकारी सोमशेखर स्वामी, गुरुबाळा सन्के व अमोल भंडारी यांनी प्रशासनाच्या भूमिकेतून मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या अंतिम सत्रात साक्षरता कार्यक्रमाच्या आशयावर आधारित जिल्ह्यातील 11 तालुके व महानगरपालिका समूहाने दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी डॉ.प्रभाकर बुधाराम, सिद्धेश्वर निंबर्गी, गुरुबाळा सनके, सोमशेखर स्वामी, जीवराज खोबरे, मल्लीनाथ निंबर्गी, प्रकाश राचेटी, सिद्धाराम माशाळे, बाळासाहेब वाघ, हेमा शिंदे, अब्बास शेख, संजय डोके, डॉ. नागनाथ येवले, विलास नामा, गणेश वाघमारे, अमित भोरकडे, दीपक पारडे, अनिल थोरबोले, यांनी परिश्रम घेतले. महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सचिन ठोकळ, प्राचार्य दत्तात्रय गाजरे, मुख्याध्यापक घोडके व शिक्षकवृंद या सर्वांनी सहकार्य केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत सरुडकर यांनी केले.