सोलापूरक्रीडाजिल्हा परिषद

जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी खिलाडूवृत्ती जोपासली पाहिजे

सोलापूर : हातात झेंडा घेऊन एक ताल करीत परेड व लेझीमचा ताल, झांज पथकाच्या निनादात जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धांना गुरुवारी उत्साहात सुरूवात झाली.

नेहरूनगर येथील जय जवान जय किसान सैनिक स्कूलच्या मैदानावर मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून क्रीडा स्पर्धांना सुरूवात झाली. क्रीडा व सांस्कृतिक नियोजन समितीचे सहप्रमुख तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिणकर, प्रकल्प संचालक एस.बी. ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे, अमोल जाधव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख,माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, क्रीडा विशेष निमंत्रीत सदस्य रविंद्र चव्हाण,गणेश पवार, संतोष जाधव, सचिन जाधव, विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, गिरीष जाधव, अनिल जगताप, संजय सांवत यांची प्रमुख उपस्थित होती.

जिल्हा परिषदे मधील अधिकारी व कर्मचारी यांच्यात स्पर्धेच्या माध्यमातून खिलाडूवृती जोपासली जावी, खेळाच्या मैदानात खिलाडूवृत्तीने खेळा. खेळाच्या नियमाचे पालन करा, वाद मैदानाच्या बाहेर ठेवा अशा शब्दात सीईओ जंगम यांनी शुभेच्छा दिल्या.अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी दोन दिवसात खिलाडूवृत्तीने खेळा अशी अपेक्षा व्यक्त केली. उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी कर्मचारी व अधिकारी यांच्यामध्ये परस्पर समन्वय, सहनशीलता, ताणतणावाचे व्यवस्थापन इत्यादी मूल्ये वाढीस लावून निखळ मनोरंजनातून आनंद घेणे या स्पर्धेचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. पंचाच्या नियमांचे पालन करा. या स्पर्धेतून पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी यांच्यामधील प्रशासकीय कामाचा थकवा घालवून व परस्पर सद्भावना वाढीस लागून नव्या जोमाने, नव्या उत्साहाने कार्यास लागता यावे या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असल्याचे स्मिता पाटील यांनी सांगितले.

या स्पर्धेत सर्व विभागातील मुख्यालय व सर्व तालुक्यातून दोन हजार पेक्षा जास्त खेळाडू व कलावंत या स्पर्धेत सहभागी होणार असून याला क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व समित्यांचे प्रमुख, सचिव व सदस्य तसेच क्रीडा व नियोजन समितीचे सहसचिव अनिल जगताप, सहसचिव संजय सावंत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, किरण लोंढे,सदस्य विवेक लिंगराज, अविनाश गोडसे, झहीर शेख, नागेश पाटील, सचिन साळुंखे, नागेश धोत्रे, गिरीष जाधव, गणेश कुडले पुंडलिक कलखांबकर, शिवाजी वसपटे, शहानवाज मुल्ला, मल्लिकार्जुन सोमेश्वर, डॉ. माधुरी भोसले, नरेंद्र अकेले, इरफान कारंजे व कृष्णकांत लोवे, प्रा. राजू प्याटी आदी क्रिडा स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

खेळाडूमध्ये चैतन्याची लहर

कुसूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलांच्या लेझीम पथकाने सर्वांचे लक्ष वेधले. जय जवान व जय किसान विद्यालयाच्या एनसीसी कॅडेटसनी सिईओ कुलदीप जंगम, अतिरिक्त सिईओ संदीप कोहिणकर यांच्यासह विभाग प्रमुखांनी ११ तालुक्याचे व मुख्यालयातील खेळाडू व एनसीसी कॅडेटसची मानवंदना स्विकारली.  रंगीबेरंगी टी शर्ट व पॅंट आकर्षक पेहरावमध्ये जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी खेळाडू म्हणून सहभागी झाले होते.

जिल्हा परिषद टीमचे कौतुक

एखाद्या राष्ट्रीय क्रिडा स्पर्धेस लाजवेल अशा प्रकारे या क्रिडा स्पर्धंचे आयोजन करणेत आले होते. स्पर्धेच्या उत्कृष्ठ संयजोनाबद्दल जिल्हा परिषदे टीमचे कौतुक सिईओ कुलदीप जंगम यांनी केले. सुत्रसंचालन स्वागत समितीचे प्रमुख अविनाश गोडसे यांनी केले तर समितीचे सहसचिव संजय सावंत यांनी आभार मानले.

आजच्या सामन्याचे निकाल 

जय जवान जय किसान सैनिकी स्कूल नेहरूनगर सोलापूर येथील मैदानावर आज संपन्न झालेल्या पदाधिकारी अधिकारी व कर्मचारी क्रीडा सांघिक स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे- खो-खो पुरुष सांगोला व पंढरपूर उपांत्य फेरीत प्रवेश, कबड्डी पुरुष मोहोळ,पंढरपूर उपांत्य फेरीत प्रवेश,कबड्डी महिला उत्तर सोलापूर,दक्षिण सोलापूर पात्र,डायरेक्ट हॉलीबॉल दक्षिण सोलापूर,बार्शी,मोहोळ,पंढरपूर उपांत्य फेरीत प्रवेश,थ्रोबॉल महिला दक्षिण सोलापूर, माळशिरस उपांत्य फेरीत प्रवेश क्रिकेट स्पर्धा कुर्डूवाडी उपांत्य फेरीत प्रवेश

वैयक्तिक निकाल खालीलप्रमाणे

100 मीटर धावणे पुरुष प्रथम क्रमांक नितीन गुंड (मोहोळ) नंदकुमार खुर्द (मोहोळ) द्वितीय क्रमांक,तृतीय क्रमांक सुनील बाबर (माळशिरस), 100 मीटर धावणे महिला प्रथम क्रमांक रूपाली आसबे (माळशिरस),द्वितीय क्रमांक रेश्मा कवडे (पंढरपूर),मीरा पिठले (उत्तर सोलापूर),400 मीटर धावणे पुरुष प्रथम क्रमांक चंद्रकांत दसाडे (माळशिरस),द्वितीय हिरा पवार (दक्षिण सोलापूर),तृतीय प्रकाश सातव (पंढरपूर),400 मीटर धावणे महिला १) वैशाली मोठे (सांगोला)२) ऐश्वर्या फडतरे (दक्षिण सोलापूर) ३) रेशमा कवडे (पंढरपूर), 5000 मीटर चालणे पुरुष १) कृष्णा डोलारे (उत्तर सोलापूर) 2) चंद्रकांत बुधाळे (दक्षिण सोलापूर), 3) जयानंद बिराजदार (दक्षिण सोलापूर), 3000 मीटर चालणे महिला १) शहानुर शेख (पंढरपूर), 2) नजमा मुजावर (दक्षिण सोलापूर), 3) वंदना बारबोले (माढा),  लांब उडी पुरुष १) नितीन गुंड (मोहोळ), २) चंद्रकांत दसाडे (माळशिरस), ३) दीपक शेळके (मोहोळ), लांबउडी महिला १) रूपाली राठोड, (दक्षिण सोलापूर), २) रूपाली भोई (पंढरपूर), ३) कल्पना उकिरडे (बार्शी),

थाळीफेक पुरुष १) संदीप खेडकर (पंढरपूर), २) अतुल घोगरे (करमाळा), ३) हनुमंत इंगळे (माढा).

थाळी फेक (महिला)१) रूपाली आसबे (माळशिरस), २) अमरजा काळे (पंढरपूर), ३) राजश्री कांगरे (मुख्यालय).

गोळा फेक (महिला) १) रूपाली आसबे (माळशिरस), २) मीनाक्षी सूर्यवंशी (माळशिरस), ३) स्नेहा विरनक (उत्तर सोलापूर).

गोळा फेक (पुरुष) १) प्रदीप भोसले (माळशिरस), २) सिताराम रोंगे (पंढरपूर), ३) विकास कांबळे (पंढरपूर).

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button