जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धेत कोणी कोणी मारली बाजी

सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्रशासनातर्फे आयोजित पदाधिकारी,अधिकारी व कर्मचारी क्रीडा स्पर्धा उत्साहपूर्ण वातावरणात सोलापुरात पार पडल्या. आज विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रमाने क्रीडा स्पर्धांचा समारोप होणार आहे.
सांघिक स्पर्धेचा निकाल खालील प्रमाणे आहे.
कबड्डीपुरुष
पंढरपूर विजयी,सांगोला उपविजयी
कबड्डी महिला
सांगोला विजयी,मोहोळ उपविजयी
डायरेक्ट हॉलीबॉल
बार्शी विजयी,पंढरपूर उपविजयी
थ्रो-बॉल महिला
मोहोळ विजयी दक्षिण सोलापूर उपविजयी
क्रिकेट
पंढरपूर विजयी बार्शी उपविजयी
रिले
4×100 रिले पुरुष मोहोळ विजयी दक्षिण सोलापूर उपविजयी
4×100 रिले महिला दक्षिण सोलापूर विजयी उत्तर सोलापूर उपविजयी
4×100 मिश्र रीले दक्षिण सोलापूर विजयी,मोहोळ उपविजयी
बॅडमिंटन
पुरुष एकेरी
1)राहुल गुरवे मोहोळ
2) अतावर शेख माढा
महिला
1) प्रेरणा मठपती मोहोळ 2)आकांक्षा जाधव अक्कलकोट
बॅडमिंटन
दुहेरी पुरुष
1)राहुल गुरवे माऊली मुंडे मोहोळ
2) प्रवीण घोडके अमर शंकू उत्तर सोलापूर
महिला
1)प्रेरणा मठपती चारुशीला गुरव मोहोळ
2) शिल्पा बहिर्जी शुभांगी पवार उत्तर सोलापूर
बॅडमिंटन मिश्र
1) माऊली मुंडे प्रेरणा मठपती मोहोळ
2) शुभांगी पवार अमर शंकू उत्तर सोलापूर
टेबल टेनिस
एकेरी पुरुष
1) शिराज शेख दक्षिण सोलापूर
2)प्रितेश शिंदे दक्षिण सोलापूर
महिला
1) नूर जहा शेख दक्षिण सोलापूर
2) सरस्वती पवार उत्तर सोलापूर
टेबल टेनिस दुहेरी पुरुष
1) सलीम चाबरू शिवाजी हॉस्पिटल उत्तर सोलापूर
2) शिराज शेख बालाजी गुरव दक्षिण सोलापूर
महिला
1) नूर जहा शेख मंजुषा कलशेट्टी दक्षिण सोलापूर 2)सरस्वती पवार शिल्पा बहिर्जी उत्तर सोलापूर
टेबल टेनिस
मिश्र
1) शिराज शेख अमृता कोटेकर दक्षिण सोलापूर
2) स्मिता पाटील गोपीचंद नारायणकर मुख्यालय
कॅरम पुरुष
1) अजित अभंगराव पंढरपूर
2) अशोक पाटील मंगळवेढा महिला
1) सुदर्शना चौरे
2) उर्मिला लोणारे
कॅरम दुहेरी पुरुष
1)रवींद्र जाधव नितीन झाडे बार्शी 2)ज्वालाप्रसाद प्रभाकर मठ अक्कलकोट
महिला कॅरम दुहेरी
1)वनिता शिंदे दिपाली तापोळे माळशिरस
2)सुदर्शना चवरे उर्मिला लोणारे
बुद्धिबळ
पुरुष
1) गुंजरगे राष्ट्र भूषण अक्कलकोट
2) शशिकांत कुंभार मोहोळ
महिला
1) रशिदा आतार बार्शी
2) सुलभा बडूरे उत्तर सोलापूर
संगीत खुर्ची
1) अलका कदम दक्षिण सोलापूर
2) शिल्पा तुळजापुरे मोहोळ
लिंबू चमचा
1) सोनाली खरात दक्षिण सोलापूर
2) रेमा कदम दक्षिण सोलापूर
स्पर्धा यशस्वी करण्यासाठी क्रीडा अधिकारी गणेश पवार, संतोष जाधव, पंचप्रमुख राजू पॅटी, समन्वयक फैज अहमद बेगमपुरे, तुकाराम शेंडगे, दशरथ गुरव,बि.डी.राठोड, श्रीरंग बनसोडे,सचिन घोडके,गणेश कुडले, शहानवाज मुल्ला,शिवाजी वसपटे,पुंडलिक कलखांबकर,रवी चव्हाण, नरेंद्र अकेले,कृष्णा लोंढे आदींनी परिश्रम घेतले.
सीईओनी वाढविला उत्साह…
जिल्हा परिषद परिषदेच्या क्रीडा स्पर्धाच्या उद्घाटनादिवशी म्हणजेच गुरुवार दिनांक 6 फेब्रुवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या अंगात कणकण होती. तरीही ते नेहरूनगर च्या मैदानावर उत्साहाने हजर झाले व जिल्हा परिषद मुख्यालय आणि पंचायत समितीच्या संघातील खेळाडूंना प्रोत्साहित केले. जिल्हा परिषद अधिकारी व पत्रकार यांच्यात झालेल्या मैत्रीच्या सामन्यात भर उन्हात हातात बॅट घेऊन ते मैदानावर उतरले. त्यांचा उत्साह पाहून इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनाही आनंदाचे भरते आले. त्याचबरोबर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकंदे, अमोल जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप, प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, संजय धनशेट्टी यांच्याबरोबर इतर विभाग प्रमुखांनी ही खेळांमध्ये जोश दाखविला. इतकेच काय उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी टेबल टेनिस चे मैदान गाजवले. अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात जिल्हा परिषदेच्या क्रीडा स्पर्धा पार पडल्या.