स्मिता पाटील टेबल टेनिसमध्ये विजयी तर माळशिरसचा धसाडे ठरला गोल्डन खेळाडू

सोलापूर : जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी क्रिडा स्पर्धा व सांस्कृितक कार्यक्रमाचे पारितोषिक वितरण जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्याहस्ते करण्यात आले.
हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाचा समारोप क्रिडा स्पर्धा व सांस्कृितक कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाने करण्यात आले. या प्रसंगी प्रसंगी ग्रामीण विकास यंत्रणा विभागाचे प्रकल्प संचालक सुधीर ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मिनाक्षी वाकडे , जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षणाधिकारी कादर शेख, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, गटविकास अधिकारी सुशांत संसारे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, सहाय्यक प्रशासन अधिकारी विवेक लिंगराज, अनिल जगताप, कक्ष अधिकारी अविनाश गोडसे, प्रमुख उपस्थित होते. या कार्यक्रमात क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेत यशस्वी ठरलेल्यांना पारितोषिक देण्यात आली त्यामध्ये टेबल टेनिस मध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील तर गोल्डन खेळाडू म्हणून माळशिरसच्या धसाडे यांना सन्मानित करण्यात आले.
क्रीडास्पर्धेत सांघिक खेळात पंढरपूर तालुक्याने कबड्डी आणि क्रिकेट स्पर्धेत प्रथम तर व्हॉलीबॉल खेळात द्वितीय क्रमांक पटकावला. पुरुषांच्या कबड्डी संघात सिद्धेवाडी जि.प. प्राथमिक शाळेचे शिक्षक धनाजी जाधव, त्यांचे बंधू आणि ग्रामपंचायतीचे संगणक ऑपरेटर भास्कर जाधव, ग्रामपंचायतीचे सदस्य रणजित जाधव हे तीन खेळाडू संघाचे आधारस्तंभ होते. सिद्धेवाडी केंद्रातील शिरगांव शाळेतील शिक्षक आणि देगाव (ढेकळेवाडी) गावचे सुपुत्र राहुल बनसोडे (गुरुजी) यांचाही खेळातील वाटा अतिशय महत्त्वाचा होता. जिल्ह्यात विजयी ठरलेल्या सर्व खेळाडूंचे सीईओ कुलदीप जंगम यांनी अभिनंदन केले.
सांस्कृतिक स्पर्धेचा निकाल…