
सोलापूर : सोलापूर विभागाचे वरिष्ठ अधिक्षक के. नरेंदर बाबू यांच्या नेतृत्वाखाली आणि सर्वांच्या कठोर परिश्रमाने सोलापूर टपाल विभागाने सन 2024-2025 या आर्थिक वर्षात सर्व निकषांमध्ये सर्वोत्तम कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट विभाग पुरस्कार (रोलिंग ट्रॉफी ) जिंकला आहे . पुणे येथे पार पडलेल्या क्षेत्रीय पुरस्कार वितरणाच्या भव्य समारोह सोहळ्यात मुख्य पोस्टमास्टर जनरल महाराष्ट्र परिमंडळ मुंबई, अमिताभ सिंह यांनी पुणे क्षेत्राचे, पोस्टमास्टर जनरल रामचंद्र जायभाये सर आणि पुणे क्षेत्राच्या डाक निदेशिका सिमरन कौर यांच्या उपस्थितीत सोलापूर विभागाचे वरिष्ठ अधिक्षक के. नरेंदर बाबू यांना पुरस्कार प्रदान केला.
या गौरव समारोह सोहळ्यात सर्वोत्तम विभाग पुरस्काराव्यतिरिक्त, सोलापूर विभागाला विविध श्रेणींमध्ये आणखी १२ पुरस्कार मिळाले आहेत.आर्थिक वर्ष 23-24 च्या अखेरीस सुरू झालेल्या के. नरेंदर बाबू यांच्या नेतृत्वाने आर्थिक वर्ष 24-25 मध्ये अविस्मरणीय फळ मिळाले आहे.
सोलापूर विभागाला मिळालेल्या बक्षिसांचे तपशील पुढीप्रमाणे आहे.
1. अजित आवारे उपडाकपाल बार्शी पोस्ट ऑफिस – सर्वाधिक POSB खाती उघडणे (ग्रामीण) प्रथम क्रमांक.
2. प्रदीप हंचे शाखा डाकपाल, नरखेड बीओ – द्वितीय क्रमांक
3. श्रीकांत जाधव, पोस्टमन सोलापूर HO – सर्वाधिक Premium खाती उघडणे (IPPB)
4. लखन पवार, पोस्टमन गुरूनानक नगर पोस्ट ऑफिस – सर्वाधिक मर्चंट खाती (IPPB) खाती उघडणे.
5. कलाप्पा पुजारी, उत्कृष्ट ड्रायव्हर, MMS (ग्रामीण)
6. विनायक पासंगराव वरिष्ठ प्रबंधक IPPB Br सोलापूर- सर्वाधिक रेव्हेन्यू प्रथम क्रमांक
7. अनिल साळुंखे सहायक अधीक्षक सोलापूर दक्षिण उपविभाग- सर्वाधिक PLI-RPLI न्यू प्रीमियम कलेक्शन
8. सुरेश काकडे निरीक्षक डाकघर, बार्शी उपविभाग – सर्वाधिक सरासरी POSB खाती उघडणे
9. सुरेश काकडे निरीक्षक, बार्शी उपविभाग- सर्वाधिक 1000+ POSB खाती प्रति शाखाडाकघर
10. सोमनाथ काळे, सहाय्यक अधीक्षक (मुख्यालय) सोलापूर- सर्वोत्कृष्ट सहाय्यक अधीक्षक मुख्यालय
11. के नरेंदर बाबू प्रवर अधीक्षक डाकघर सोलापूर विभाग- POSB नेट न्यू खाती उघडणे प्रथम क्रमांक
12. के नरेंदर बाबू प्रवर अधीक्षक डाकघर सोलापूर विभाग- PLI-RPLI न्यू प्रीमियम कलेक्शन .
पुणे क्षेत्राचा मानाचा फिरता चषक 2024-25 Gr. A (Rolling Trophy) सालाकरिता सोलापूर विभागाने पटकावला . सोलापूर जिल्हासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असून सर्व स्तरातील कर्मचाऱ्यांनी केलेल्या अविरत परिश्रमातूनच इतिहास घडवला आहे. यामध्ये सर्व जी.डी.एस., एम.टी.एस., पोस्टमन, सॉर्टिंग पोस्टमन, मेल ओव्हरसियर, पी.ए., एस.पी.एम., ओ.ए., आय.पी., ए.एस.पी. यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.
सोलापूर विभागाने अव्वल नंबर चा पुरस्कार स्वीकारत असताना हे यश विभागातील सर्व कर्मचाऱ्यांना समर्पित असून सोलापूर विभागाचे किर्तीमान आणि यशाचा ध्वज असाच उंच ठेवण्यासाठी आपण यापुढेही संघटित होऊन बंधुभावाने कार्य करत राहूया.
के. नरेंदर बाबू
वरिष्ठ अधीक्षक, सोलापूर