एसआरपी झेडपी कॅम्प शाळेतील विद्यार्थ्यांचे सैनिक होण्याचे स्वप्न
सातवीच्या विद्यार्थ्यांना दिला निरोप

सोलापूर : एसआरपी कॅम्प जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिकणारे विद्यार्थी सर्वगुण संपन्न व भविष्याशी आहेत, असे मत एसआरपीएफ ग्रुप नं. 10 चे सहायक समादेशक महेश मते समादेशक यांनी व्यक्त केले.
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प मध्ये इयत्ता सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्याचा कार्यक्रम राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 10 चे समादेशक सहाय्यक महेश मते यांच्या अध्यक्षतेखाली शेडमाळे, कोरे, म्हेत्रे व शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रियांका माळी यांच्या प्रमुख उपस्थित पार पडला.
यावेळी सागर लिंबितोटे, गायत्री काळुंके, प्रज्ञा जमादार, मानव चव्हाण, प्रीती खांडेकर, नंदिनी बंडगर, जेनिफर बद्दीपुडी या विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. एसआरपी जवानाप्रमाणे सैनिक होऊन देशसेवा करण्याचा मनोदय विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. वर्ग शिक्षक श्रीशैल समदुर्ले यांच्याकडून सर्व विद्यार्थ्यांना कंपास व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. शाळेत अप्रगत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या स्वयंसेविका रेखा आरणकेरी, देवकर यांचा सन्मान महेश मते यांच्याहस्ते करण्यात आला. यावेळी शिक्षक बाळासाहेब खटाळ, श्रीशैल समदुर्ले, प्रियंका माळी यांची भाषणे झाली.
कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषणात महेश मते यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. शाळेच्या भौतिक सुविधा व स्वच्छतेच्या बाबतीत 100% सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एस आर पी कॅम्प येथे शिकणारा विद्यार्थी सर्वगुण संपन्न व भविष्याशी लढणारा होणार आहे. कारण हा विद्यार्थी खेळ, अभ्यास, स्पर्धा परीक्षा, विविध कला, या सर्वांमध्ये पारंगत होत आहे. शाळेने शैक्षणिक वर्ष 24 -25 मध्ये राज्य, राष्ट्रीयस्तरापर्यंत क्रीडा क्षेत्रात भरारी घेतली आहे. शाळेमध्ये शैक्षणिक सहल, वनभोजन, स्नेहसंमेलन, क्रीडा स्पर्धा, गणित विषयाच्या स्पर्धा परीक्षा, इत्यादी उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आले असल्याने याचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होऊन ही मुले सर्व क्षेत्रात अव्वल स्थानावर राहतील. यातून मोठे अधिकारी निर्माण होतील, असे मत मते यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मुख्याध्यापक पुंडलिक कलखांबकर, शाळेतील सर्व शिक्षक वृंद बाळासाहेब खटाळ, सारिका राठोड, कृपा राठोड, श्रीशैल समदूर्ले,अंगणवाडी सेविका राजश्री करकंटी, कल्पना बिराजदार, श्वेता उंबरजे यांनी परिश्रम घेतले.