सोलापुरात पुन्हा एका डॉक्टराची आत्महत्या

Rajkumar Sarole
1 Min Read

सोलापूर : प्रसिद्ध न्यूरोसर्जन  डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच सोलापुरात पुन्हा एका डॉक्टराने आत्महत्या केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय तथा सिविल हॉस्पिटलमधील एका शिकाऊ डॉक्टराने होटगी रोडवर भाड्याने घेतलेल्या फ्लॅटमध्ये आत्महत्या केली आहे.

आदित्य नामबियर असे आत्महत्या केलेल्या डॉक्टराचे नाव आहे. होटगीरोडवर भीमा कालवा मंडळ कार्यालयाच्या बाजूला असलेल्या वसाहतीमधील एका आपार्टमेन्टमधील फ्लॅट त्याने भाड्याने घेतला होता. या ठिकाणी तो एकटाच राहत होता. हात व गळा चिरून या डॉक्टराने आत्महत्या केली आहे. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीला आला.  सन 2019 च्या शासकीय मेडिकल कॉलेजचा हा विद्यार्थी असून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवा देत होता. या डॉक्टराने अशा पद्धतीने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. डॉक्टराचा मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हील हॉस्पिटलमध्ये न्यायवैद्यक विभागात नेण्यात आला आहे. वस्तीग्रहातील इतर डॉक्टरांची सिव्हील हॉस्पिटलमध्ये गर्दी झाली आहे. विजापूरनाका पोलिसांनी याची नोंद घेतली असून पुढील चौकशी सुरू आहे, असे सांगण्यात आले.

Share This Article
1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *