सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी अनेक वर्षापासून एकाच ग्रामपंचायत ठाण मांडलेल्या ग्रामसेवकांच्या बदल्या केल्या नाहीत तोवरच त्यांचा कारभार चव्हाट्यावर आला आहे. कुंभारी व मंद्रूप ग्रामसेवकांच्या कारभाराची चौकशी करण्याची मागणी यापूर्वीच करण्यात आली असल्याचे आता उघड झाले आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी 30 मे रोजी ग्रामपंचायत व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात कुंभारी ग्रामपंचायत गेल्या 28 वर्षापासून ठाण मांडलेले ग्रामविकास अधिकारी सहदेव ढेपे यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष शेलार यांनी यापूर्वीच जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. शेलार यांनी माहितीच्या अधिकारात ढेपे यांच्या कार्यकालाची माहिती घेतली आहे. कुंभारी ग्रामपंचायत सोलापूर शेजारी असून हद्दीत अनेक प्लॉट झालेले आहेत. प्लॉटिंगच्या एनओसी मधून ग्रामपंचायतीला मोठा निधी मिळणे अपेक्षित असताना या काळात संशयास्पद कारभार झाला आहे,असे त्यांचे म्हणणे आहे.
त्यानंतर सोलापूर शहराजवळच असलेल्या मंद्रूप ग्रामपंचायतचा नंबर लागत आहे. माजी ग्रामपंचायत सदस्य नितीन रणखांबे यांनी सन 2012 ते सन 2017 या कालावधीत मंद्रूप ग्रामपंचायतचे आर्थिक लेखापरीक्षण झालेले नाही. या काळात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला आहे. याबाबत तत्कालीन मंत्री गिरीश महाजन यांनी चौकशीचे आदेश दिले होते त्यानुसार चौकशी समितीही नेमण्यात आली होती. पण त्या समितीचे पुढे काय झाले? ग्रामपंचायतीचा कारभार अनियमित असून तत्कालीन सरपंच व ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी अशी त्यांनी मागणी केली आहे. यामुळे तत्कालीन व विद्यमान सरपंच अनिता कोरे व तत्कालीन ग्रामसेवक दयानंद पाटील यांची कारकीर्द धोक्यात येणार आहे. नुकत्याच समाजकल्याण विभागाच्या पथकाने मंद्रूप ग्रामपंचायतच्या कारभाराची चौकशी केली आहे. या पथकाने काय अहवाल दिला? हे अद्याप समोर आलेले नाही. ग्रामसेवकांच्या बदल्या झाल्या नाहीत तोवर या दोन मोठ्या ग्रामपंचायतीचा कारभार चव्हाट्यावर आल्यामुळे जिल्हा परिषदेत हा विषय चर्चेचा झाला आहे.
या आहेत तक्रारी…



More Stories
राज्यातील सर्व महिलांना लखपती दीदी बनविणार: जयकुमार गोरे
तुम्हाला बैलगाडी, घोंगडी हवी आहेत का? मग या ठिकाणी भेट द्या
सोलापूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना आश्वासित योजनेचा लाभ