सोलापूरआरोग्यजिल्हा परिषद

पंढरपुरात आषाढी यात्रेत घेणार कोरोनाची खबरदारी

सोलापूर : महाराष्ट्राला पंढरपुरातील आषाढी यात्रेचे वेध लागले आहेत. या वर्षभूमीवर प्रशासनाची जोरदार तयारी सुरू झाली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी सर्व विभाग प्रमुखांनी जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी सूचना केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेचा आरोग्य विभागही सज्ज झाला आहे. राज्यभरात कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने आषाढी यात्रा काळात ही आरोग्य विभागातर्फे खबरदारी घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले यांनी दिली आहे.

आषाढी यात्रेची तयारी राज्य पातळीवरून सुरू झाली आहे. मुख्यमंत्र्यांबरोबरच सचिव दर्जाचे अधिकारी व्हीसीद्वारे वारंवार तयारीबाबत आढावा घेत आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनीही प्रशासकीय पातळीवर सर्व सुविधांची तयारी सुरू केली आहे. पालखी मार्गावरून पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या सुविधेबरोबर निवारा व आरोग्य याबाबतही काळजी घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत व आरोग्य विभाग संबंधित ग्रामपंचायतीमार्फत या सुविधा उपलब्ध करून देणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी आरोग्य विभागाची बैठक घेऊन उपाय योजनेबाबत आवश्यकता सुचना केल्या आहेत.

याबाबत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले म्हणाले की पालखी मार्गावर जवळपास 159 ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची सोय करण्यात येणार आहे. याशिवाय जवळपास 19 ठिकाणी आजारी वारकऱ्यांना ऍडमिट करून उपचार देण्यात येणार आहेत. ॲम्बुलन्स व दुचाकी ॲम्बुलन्सची सोय राहणार आहे. राज्यात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. शासन स्तरावरून याबाबत अध्यक्ष सूचना प्राप्त झाल्या नसल्या तरी राज्यातील मोठी यात्रा असल्याने याबाबत खबरदारी घेण्यात येणार आहे. वारकऱ्यांना मास्क, सॅनिटायझर व इतर उपचारांची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे निवारा ठिकाणी ग्रामपंचायत विभागामार्फत वारकऱ्यांना पाय मसाजचीही सोय करण्यात येणार आहे. यात्रा काळात पालखी मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य विभागाच्या सर्व टीम सज्ज राहणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button