February 21, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी सोलापुरातून 47 हजार विद्यार्थ्यांची नोंदणी

सोलापूर : सन २०२५-२६ पासून संपूर्ण राज्यामध्ये उच्च माध्यमिक शाळांमध्ये इयत्ता ११ वीचे प्रवेश केंद्रीय ऑनलाईन प्रणालीव्दारे राबविण्यात येत असून यात सोलापूर जिल्ह्यामध्ये ४७ हजार ६९ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे, अशी माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रभारी शिक्षण संचालक डॉ. श्रीराम पानझाडे यांनी  दिली आहे.

इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेसाठी राज्यातील कनिष्ठ महाविद्यालय/उच्च माध्यमिक शाळांची पहिल्या फेरीमध्ये ९४३५ नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यामध्ये विद्यार्थी एकूण प्रवेश क्षमता २१२३०४० असून त्यापैकी कॅप फेरीसाठी प्रवेश क्षमता १८९७५२६ तसेच कोटा प्रवेश क्षमता २२५५१४ इतकी आहे.विद्यार्थी नोंदणीसाठी दि. २६ मे २०२५ पासून संकेतस्थळावर सुरुवात झालेली असून पहिल्या दिवशी २५८८८७ इतकी नोंदणी झालेली आहे. दि. २७ मे रोजी म्हणजेच दुसऱ्या दिवशी २०७६१२ इतकी विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. तिसऱ्या दिवशी दि. २८ मे रोजी १४४०५७ इतकी विद्यार्थी नोंदणी झालेलो आहे. चौथ्या दिवशी दि. २९ मे रोजी १५१७३३ इतकी विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. पाचव्या दिवशी दि. ३० मे रोजी ११७९७० इतकी विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. सहाव्या दिवशी दि. ३१ मे २०२५ रोजी ८२१३३ इतकी विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. सातव्या दिवशी दि. १ जून रोजी ४०५७६ इतकी विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. आठव्या दिवशी दि. २ जून रोजी ९१६३२ इतकी विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. नवव्या दिवशी दि. ३ जून रोजी इतकी ६७७८३ विद्यार्थी नोंदणी झालेलो आहे. दहाव्या दिवशी दि. ४ जून रोजी  ५१०७४ विद्यार्थी नोंदणी झालेली आहे. तसेच अकराव्या दिवशी म्हणजे अंतिम दिनांकास ५ जून  दुपारी २ वाजेपर्यंत ५७८३८ विद्यार्थी नोंदणी झालेली आहे.अंतिम तारखेपर्यंत इयत्ता ११ ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया एकूण विद्यार्थी नोंदणी संख्या १२ लाख ७१ हजार २९५ इतकी आहे. पुणे विभागात सोलापूर जिल्ह्यातून ४७ हजार ६९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यातील ४६ हजार ३९४ विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पेमेंट केले आहे. राज्यातील एकूण ऑनलाईन नोंदणीचा तपशील खाली नमूद करण्यात आला आहे.

१) नोंदणी (रजिस्ट्रेशन) शुल्क १२ लाख १५ हजार १९० विद्यार्थ्यांनी ऑनलाईन जमा केलेले आहे.

२) अर्ज भाग-१ भरलेले १२ लाख ५ हजार १६२ विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहेत.

३) अर्ज भाग-२ भरुन अंतिम करुन ११ लाख २९ हजार ९२४ विद्यार्थ्यांनी लॉक केलेले आहेत.

४) नियमित फेरी (कॅप राऊंड) साठी ११ लाख २९हजार ९३२ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

५) इनहाऊस कोटा साठी ६४ हजार २३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

६) व्यवस्थापन (मॅनेटमेंट) कोटासाठी ३२ हजार ७२१ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.

७) अल्पसंख्यांक (मायनॉरिटी) कोटासाठी ४७हजार ५७८ विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत.