August 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

राज्यातील जलजीवन मिशनच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी 14 कोटी 57 लक्ष निधी वितरीत

मुंबई : राज्यातील पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील जलजीवन मिशन अंतर्गत काम करणरे कर्मचारी यांचे गेल्या ९ महिने पासून थकित असलेले वेतना साठी आज 14 कोटी 57 लक्ष निधी वितरण जिल्हास्तरावर करणेत आले आहे अशी माहिती कर्मचारी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी दिली.

पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील स्वच्छ भारत मिशन व जलजीवन मिशनमधील कर्मचारी यांचे प्रश्नाबाबत राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल, मुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव श्रीकर परदेशी यांची भेट घेऊन चर्चा करणेत आली होती.पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील जिल्हा स्तरावरील जलजीवन मिशन व स्वच्छ भारत मिशन व तालुका स्तवरील बीआरसी सीआरसी, वाॅशचे कर्मचारी यांचे वेतन करणे साठी मंत्रालयात राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेणेत आली होती.राज्याचे कृती समितीचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड, कार्याध्यक्ष सचिन जाधव, उपाध्यक्ष ऋषीकेश शिलवंत, उपाध्यक्ष बंडू हिवरे यांनी सातत्याने याची पाठपुरावा केला होता. आमदार सुधीर मनगुंटीवार यांनी देखील पत्र देऊन बैठक आयोजित केली होती.जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक गंगाथरण, सहसचिव गीता कुलकर्णी, अतिरिक्त अभियान संचालक दिपाली देशपांडे यांनी सात दिवसांत वेतना साठी निधी जिल्हा स्तरावर वर्ग करणेत येणार असल्याचे बैठकीत सांगतिले होते. त्या नुसार निधी प्राप्त झाला आहे.

जिल्हास्तरावरील कर्मचारी यांचे वेतनासाठी 2 कोटी 92 लक्ष, बीआरसी व सीआरसी यांचे वेतनासाठी 7 कोटी 26 लक्ष, वाॅशअंतर्गत काम करणारे इंजिनियर, डाटी एन्ट्री आॅपरेटर यांचे वेतनासाठी 4 कोटी 38 लक्ष रूपये निधी वितरीत करणे आला आहे. प्रकल्प संचालक डी गंगाथरण यांनी तात्काळ निधी वितरीत करणे प्रयत्न केले.जलजीवन मिशन साठी वेतना साठी निधी प्राप्त झालेला आहे. तसेच स्वच्छ भारत मिशन ग्रामीण साठी राज्य हिस्सातून निधी उपलब्ध झालेला आहे. सदर निधी या आठवड्यात जिल्हा स्तरावर वर्ग करणेत येणार आहे.याबाबत केंद्राकडे स्वच्छ भारत मिशनचे निधीची मागणी केली होती. केंद्राकडून राज्य हिस्सातून निधी उपलब्ध करून द्या असे लेखी पत्र दिले आहे.

केवळ चार महिन्याचे वेतन होणार

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूर येथे भेटून निवेदन दिले होते. तात्काळ त्यांनी वेतनाबाबत सुचना दिले होते. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केंद्र शासना कडे या साठी पाठपुरावा केला होता. उर्वरीत वेतन वेळेत मिळावे हीच अपेक्षा आहे. स्वच्छ भारत मिशन मधील कर्मचारी देखील वेतनाचे प्रतिक्षेत आहेत असेही कार्याध्यक्ष सचिन जाधव यांनी सांगितले.

आंदोलन स्थगित: अध्यक्ष गायकवाड

विधान मंडळाचे अधिवेशनात वेतनाबाबत चर्चा झाली होती. जलजीवन मिशन चे कर्मचारी ९ महिने वेतनाचे प्रतिक्षेत होते. उर्वरीत ५ महिनेचे वेतन तातडीने मिळावे. स्वच्छ भारत मिशन चे ५ महिनेचे वेतन अद्याप बाकी असून ४७ कोटी रूपये प्राप्त आहेत. मुंबईत ३ आॅगष्ट पासून आंदोलन सुरू करणेत येणीर होते परंतू ते आंदोलन स्थगित करणेत येत असल्याचे अध्यक्ष रमाकांत गायकवाड यांनी सांगितले.