February 4, 2026

Solapur Samachar

Latest Marathi News

महाआरोग्य शिबिराचा आषाढी वारीतील वारकऱ्यांना मोठा फायदा

सोलापूर : आषाढी वारीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून पंढरपूर व पालखी मार्गावर राबविण्यात आलेल्या महाआरोग्य शिबिराचा वारकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे दरवर्षी आषाढी वारीच्या वेळेस वारकऱ्यांच्या आरोग्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून यंदाही आषाढी वारीच्या सोहळ्यात महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. पंढरपूरसह तीन ठिकाणी हे महाआरोग्य शिबिर घेण्यात येत आहे. पालखी सोहळ्यांबरोबर वारीमध्ये सहभागी झालेल्या अनेक वारकऱ्यांना या महाआरोग्य शिबिराचा फायदा झाला आहे. आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येत असल्यामुळे राज्यातून विविध ठिकाणाहून आलेल्या ज्येष्ठ नागरिकांना याचा मोठा लाभ झाला आहे. आरोग्यमंत्र्यांनी या आरोग्य शिबिराच्या नियोजनाचा आढावा घेऊन जिल्हा आरोग्य विभागामार्फत सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत कौतुक केले आहे. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर माने व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या विविध टीम पालखी मार्गावर आरोग्य सेवा देत आहेत त्याचबरोबर पालखी सोहळ्याबरोबर चालत असलेल्या आठ मुख्यमंत्री औषध रथाचा वारकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे.