सोलापूर : आषाढी यात्रेचे उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांचा जिल्हा परिषद बीट पत्रकार संघातर्फे सन्मान करण्यात आला.
पंढरपुरातील आषाढी वारीचा सोहळा नुकताच पार पडला. वारीसाठी येणाऱ्या पालखी व त्यासोबत असणाऱ्या वारकऱ्यांना सुविधा देण्याचे नियोजन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येते. यंदा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या टीमने उत्कृष्ट नियोजन केले. जंगम यांच्या टीमच्या नियोजनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कौतुक केले आहे. पदभार घेतल्यानंतर जंगम यांचा आषाढी यात्रेचा अनुभव पहिल्यांदाच होता. मागील वारी सोहळ्याचा अभ्यास करून जंगम यांनी यावर्षी दुप्पट यंत्रणा कामाला लावली. त्यांच्या या नियोजनामुळे भाविकांच्या संख्येत वाढ झाली तरी सुविधांचा योग्य वापर झाला. यासाठी जंगम हे पालखी मार्गावर दहा दिवस तळ ठोकून होते. त्यांच्या या उत्कृष्ट नियोजनाबद्दल जिल्हा परिषद बीट पत्रकार संघातर्फे अध्यक्ष शेखर गोतसुर्वे यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सन्मान केला. प्रारंभी राजकुमार सारोळे यांनी प्रास्ताविक केले. सीईओ कुलदीप जंगम व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, अमोल जाधव, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, शिक्षण अधिकारी सचिन जगताप, कादर शेख, बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, नरेंद्र खराडे, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर संतोष नवले यांच्याबरोबर सर्व गटविकास अधिकारी, खाते प्रमुख व कर्मचाऱ्यांनी आषाढी वारीचे नियोजन यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केल्याचे नमूद केले. याप्रसंगी शिवाजी सुरवसे, शरीफ सय्यद, रमाकांत साळुंखे, रविकांत बगले उपस्थित होते. सन्मानाला उत्तर देताना सीईओ जंगम यांनी वारीच्या नियोजनाचे श्रेय टीमला दिले.
आषाढी वारीमध्ये पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या निवासासठी यंदा प्रथमच उभारण्यात आलेल्या जर्मन हँगर, मंडप व नवीन सोळा रस्ते उभारण्याचे नियोजन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी केले. त्यामुळे वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाल्या. कोहिनकर यांना सलग तीन वर्षे वारीचा अनुभव असल्यामुळे वारी सुखर झाली. त्यांच्या या अनुभवाचा फायदा झाल्याबद्दल जिल्हा परिषद पत्रकार बीटतर्फे अध्यक्ष गोतसुर्वे यांनी त्यांचा सन्मान केला. याप्रसंगी प्रशांत कटारे, संदीप येरवडे, अमोल साळुंखे, गिरमला गुरव,विश्वनाथ बिराजदार,संतोष धोत्रे उपस्थित होते. सीईओ जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली सर्वच टीमने चांगले काम केले. जर्मन हँगरचा वारकऱ्यांनी दिवसा व रात्रीही उपयोग केला. यातून चांगला निवारा उपलब्ध झाल्याने ऐनवेळी जर्मन हँगरची संख्या वाढवावी लागल्याचेही कोहिनकर यांनी यावेळी नमूद केले.

More Stories
‘स्टॉप कॅन्सर’ कार्यशाळेत महिलांना मिळाले कॅन्सर प्रतिबंधासाठी ज्ञान
ट्रेनिंग सेंटरमध्ये बेकायदा बदली; त्या बदल्यात घर बांधून घेतले
सोलापूर मिनी मंत्रालयाची चावी महिलांच्या हाती; “सोलापूर समाचार’ चे वृत्त तंतोतंत खरे ठरणार