सोलापूर : खाटीक समाजात अनपेक्षित स्पर्धेमुळे निर्माण होणाऱ्या कर्जबाजारीला समाजातील लोक बाधित होत आहेत. त्यांना या कर्जबाजारीतून कर्जमुक्त करून “जकात देणारा समाज” घडवण्याचा निर्धार चिरागअली ट्रस्टचे अध्यक्ष ॲड. महिबुब कोथिंबीरे यांनी येथे बोलताना व्यक्त केला.
चिरागअली ट्रस्ट आणि सुपर अर्बन को-ऑप. सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने इम्पिरिअल गार्डन येथे आयोजित बक्कर कसाब/खाटीक समाजाच्या व्यवसायसंबंधी प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी एक मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेख समीउल्लाह हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून सुपर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन डॉ. आसिफ इक्बाल, बक्कर कसाब एज्युकेशन असोसिएशनचे अध्यक्ष अ. समद माडी, समाजाचे अध्यक्ष बिलाल बेपारी, अबुबकर कामले, हाजी युनूस कामले आदी उपस्थित होते. सुपर अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे चेअरमन डॉ .आसिफ इक्बाल यांनी व्याजमुक्त कर्ज योजना, बचत योजना व इतर वित्तीय उपाययोजनांची माहिती दिली. त्यांनी समाजाला आर्थिक नियोजन करण्याचे व मुलाबाळांच्या भवितव्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. अॅड. कोथिंबिरे यांनी समाजाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी संस्था कोणतीही कसर सोडणार नाही, असे सांगितले. हज व उमरासाठी बचत करणाऱ्या विविध योजनांचे सादरीकरण केले.ही वित्तीय संस्था कायदेशीर नोंदणीकृत असून शासनाच्या हमीवर आधारित आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी व्हा.चेअरमन मुनाफ कामले, सेक्रेटरी अ. कुद्दुस कामले, ट्रस्टी इरफान अलमेलकर, रियाज शहाजी, मुस्ताक चौधरी, इश्तीयाक शहाजी, मोइन कामले व ट्रस्टचे इतर सदस्य, इतिहासतज्ज्ञ वक्ते सरफराज शेख आणि बक्कर कसाब एज्युकेशन कमिटीचे सर्व सदस्य देखील यावेळी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सीए मौलाना शेख, जुबेर शेख, मोहसिन शेख, रेहान शेख, याकुब शेख, अली हसन, डॉ. इक्बाल धोटेघर, मुर्तुज धोटेघर, अल्ताफ कुडले, वाईज सय्यद यांनी परिश्रम घेतले.या मेळाव्याला ५०० हून अधिक लोक उपस्थितीत होते. यामुळे समाजामध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून एक सकारात्मक दृष्टीकोन विकसित झाला आहे.

More Stories
Ai watch: जनावरांच्या डॉक्टरांनी वाढवली जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी
विनायक कोंड्याल होणार सोलापूरचे महापौर
नीट परीक्षेत सोलापूरच्या डॉक्टर पती– पत्नीचे देश पातळीवर यश